एक्स्प्लोर

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, दुष्काळ कायमचा हटवण्याचा आमीरचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. हा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करत असून, आमची योजना यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा हटेल, असा विश्वास अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

  महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. लातुरात पाणी टंचाई इतकी भीषण आहे की ट्रेनने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती आपापल्या परीने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरु केला आहे. याच निमित्ताने अभिनेता आमीर खान आणि सिनेदिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी आज ‘माझाकट्टा’वरुन संवाद साधला.   “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा”   देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. मात्र, दुष्काळ निवारणाची सुरुवात महाराष्ट्रातूनच का केली, असा प्रश्न ज्यावेळी आमीरला विचारला गेला, त्यावेळी आमीर म्हणाला, “मी महाराष्ट्राचा आहे. शिवाय, महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील तीन तालुक्यांपासून पाणी फाऊंडेशनने आपलं काम सुरु केलं आहे.”   “गावा-गावात जाऊन श्रमदान करणार”   पाणी फाऊंडेशनचं काम हे श्रमदानावर अधारित असून, लोकांचा सहभाग आवश्यक आहे. मी स्वत: काही दिवसांनी श्रमदान करणार आहे, असेही यावेळी अभिनेता आमीर खान म्हणाला.   ‘वॉटर कप’ स्पर्धा काय आहे?   महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमधील 150 गावं या स्पर्धेत सहभागी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, असे हे तीन तालुके आहेत. 5 जूनपर्यंत या तीन तालुक्यांमधी जो कुणी जलसंधारणाचे सर्वोत्कृष्ट उपचार राबवेल, तो तालुका विजेता असेल. ‘पाणी अडवणे, पाणी साठवणे’ अशी संकल्पना या स्पर्धेची आहे. यातील विजेत्यांना पहिल्या क्रमांकासाठी 50 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासठी 30 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 20 लाख रुपये बक्षीस असेल.   ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’पेक्षा ‘माती अडवा, पाणी जिरवा’ घोषणा हवी!   ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या घोषणेऐवजी ‘माती अडवा, पाणी जिरवा’ अशी घोषणा हवी. कारण पावसाळ्यात माती वाहून जाता कामा नये. ती योग्यप्रकारे अडवून त्यात पाणी जिरवण्याची गरज आहे, असे सत्यजीत भटकळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Protest : हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
हात लावाल तर महाराष्ट्र बंद पाडू, फडणवीसांच्या डोक्यावर खापर फुटेल; आदित्य ठाकरेंचा रुद्रावतार, व्हॅनवर चढून व्हॅन जाग्यावर अडवली, अनिल परबही भडकले...
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget