एक्स्प्लोर
देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी
मी 'वंदे मातरम्'चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही, असं सपा नेते अबू आझमी म्हणाले.
![देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी A Real Muslim Wont Sing Vande Mataram Abu Azmi Latest Update देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/26112021/Abu_Azmi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात 'वंदे मातरम्'च्या सक्तीच्या मागणीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी 'कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम्' गाणार नाही, असं म्हणत नवा वाद छेडला आहे.
'आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी 'वंदे मातरम्'चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका' असं अबू आझमी म्हणाले.
'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावरुन शिवसेनाही मैदानात उतरली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी 'माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् बोलणार नाही' असं म्हटलं होतं. याला सेना नेते दिवाकर रावते यांनी उत्तर दिलं आहे.
'गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारं हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत.' अशा शब्दात रावतेंनी संताप व्यक्त केला.
शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले. वेळ पडली तर सभागृहात आवाज उठवेन, असंही पुरोहित म्हणाले.
काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली.
'कोणतीही विचारधारा कोणावर सोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन' असं एमआयएमचे आमदार वारिस पठाण म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)