एक्स्प्लोर
Advertisement
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने महिलेच्या अंगावर ज्वालाग्रही रसायन ओतलं
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने एका महिलेच्या अंगावर ज्वालाग्रही रसायन ओतल्याची घटना मीरारोड इथे घडली आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मीरारोड : बलात्काराचा दाखल गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने एका 26 वर्षीय महिलेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. काशिमीरा पोलिसांनी आरोपीला सोमवारी (3 फेब्रुवारी) गुजरातच्या अहमदाबाद इथून अटक केली.
महिला आपली दोन मुलं आणि बहिणीची मुलं यांच्यासह राहते. ही महिला शुक्रवारी (31 जानेवारी) रात्री नाश्त्याचे साहित्य आणि औषधे विकत घेऊन पायी घरी चालली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास एकटीच अदानी पॉवर सब स्टेशनकडून एकटीच जात होती. त्यावेळी नयानगर भागात राहणारा आरोपी आपल्या मित्रासोबत दुचाकीने आला. त्यावेळी काशिमीरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे. तसंच स्टॅम्प पेपर लिहून देण्यासाठी धमकावलं. परंतु तिने सही करण्यास आणि केस मागे घेण्यास नकार दिला. यानंतर मी पाहून घेईन, असं म्हणत तिला धमकावलं.
महिला तिथून निघाल्यावर आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील द्रव्याने भरलेली बाटली फोडली. तिने आरडाओरडा केल्याने ते दोघे हाटकेशच्या दिशेने पळून गेले. त्या ज्वालाग्रही रसायनामुळे तिच्या डोळ्याची खूपच जळजळ होऊ लागली. जमलेल्या काही जणांनी तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिला उपचारासाठी भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनीही पेट्रोल किंवा रॉकेलसारखे ज्वलनशील रसायन असल्याचं म्हटलं आहे.
वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वर्ध्यातील हिंगणघाट इथे शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेत तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेचा चेहरा भाजल्यामुळे तिच्या श्वसनक्रियेवर परिणाम झाला आहे. तिला कृत्रिमरित्या श्वास दिला जात आहे. दरम्यान तिच्यावर पेट्रोल टाकून हल्ला करणाऱ्या नराधम विकी नगराळेला 8 फेब्रुवारीपर्यंत हिंगणघाट सहदिवाणी न्यायालयाने लिस कोठडी सुनावली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पीडितेचा खटला लढणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement