एक्स्प्लोर

विरारच्या समय चौहान हत्येप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल, दोन जण अटकेत 

विरार येथील समय चौहान हत्येप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.  

Virar News Update : विरारमध्ये शनिवारी दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी सुदेश चौधरींसह नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समय चौहान या तरूणाची शनिवारी हत्या झाली होती. विरार पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. विरार येथील बांधकाम व्यावसायिक निशांत कदम याच्या 2021 मध्ये झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी समय याची हत्या झाल्याचा आरोप समय याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

मयत समर्जीत उर्फ समय चौहान याची शनिवारी विरार पूर्वेच्या डिमार्ट समोर श्रीकृष्ण फर्निचरच्या बाजूलाच भर रस्त्यात चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. समय याची हत्या करणारे शार्पशुटर होते, अशी माहिती समोर आली आहे. या दोघांनी दुचाकीवरून येऊन समय याच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या समयच्या डोक्यावर तर दोन त्याच्या पोटात  लागल्या होत्या. फायरींग करुन दोघे जण बाईकवर बसून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

मयत समयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिवसेनेचे पदाधिकारी सुदेश चौधरी, निखिल कदम, सिध्दार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. विरार पोलिसांनी गोळीबार प्रकरणी सिध्दार्थ कदम आणि संजय धुरी या दोघांना अटक केली आहे. 
 
"शिवसेनचा पदाधिकारी सुदेश चौधरी याच्या बंगल्यात समयच्या हत्येचा कट शिजला असून उत्तरप्रदेश मधील शार्पशुटरला समयला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली, होती असा आरोप समयच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबरोबरच निशांत कदम याची सप्टेंबर 2021 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात समय चौहान हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप निशांतच्या नातेवाईकांनी केला होता. त्यांनीच सुदेश चौधरीशी संगनमत करुन ही हत्या केल्याचा आरोप समय याच्या कुटुंबीयांनी केला आहे.   

दरम्यान, या प्रकरणी सुदेश चौधरी यांनी आपल्याला राजकीय सुडापोटी गुंतवलं जात असल्याचे म्हटले आहे. निशांत कदम याच्या हत्येनंतर बदला घेण्याची ही मालिका अजूनही सुरु राहिल, असे वाटत असून या प्रकरणी आपल्याला राजकीय सुडापोटी गोवलं जात आहे. या प्रकरणात आपला काहीही सबंध नसल्याचे सुदेश चौधरी यांनी सांगितले आहे.  

महत्वाच्य बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra State Commission for Women: महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका; सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
Who is Gitesh Raut: ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
ठाकरे गटाचे मुंबईतील नगरसेवक 'गितेश विनायक राऊत' कोण? पत्नीने केले कौटुंबिक छळ अन् अघोरी पूजेचे गंभीर आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Sanjay Shirsat : उबाठा गटाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय; मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगर; मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका, विनायक राऊतांवर सुमोटो कारवाईची मागणी
उबाठा गटाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय; मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगर; मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका, विनायक राऊतांवर सुमोटो कारवाईची मागणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Embed widget