News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मिठाई खाताय, सावधान! पोलिसांकडून बुरशी लागलेली 250 किलो मिठाई जप्त, कारवाईसाठी एफडीएकडे वेळ नाही

बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात आसल्याचे पोलिसांना आढळले आहे. याप्रकरणी वसईतल्या एका गोदामावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 250 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे.

FOLLOW US: 
Share:
वसई : बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात आसल्याचे पोलिसांना आढळले आहे. याप्रकरणी वसईतल्या एका गोदामावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 250 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु एफडीएला पुढील कारवाई करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे वसई-विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी वसईत बनावट पनीरच्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता वसईत बुरशी लागलेली मिठाई पुन्हा रिसायकल करुन विकली जात असल्याचे आढळले आहे. नायगांव पूर्वेकडील वाकीपाडा येथील श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यावर छापा मारला असता अत्यंत धक्कादायक घटना उघड झाली आहे. 100 किलोपेक्षा जास्त बुरशी लागलेली मिठाई या कारखान्यात आढळून आली आहे. या मिठाईत, बर्फीत घातक असं केमिकल हे मिसळले जात होते. केसर बर्फीचा स्वाद आणण्यासाठी साध्या बर्फीत लाल केमिकल वापरले जात होते. बुरशी लागलेली मिठाई एका मशीनद्वारे प्रक्रीया करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहे. पोलिसांनी अशी 150 किलो मिठाई यावेळी जप्त केली आहे. श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यात लाडू, पेढे, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मिल्क केक, मावा, काजू बर्फी, बनवली जाते. मावा बनविण्यासाठी गुजरात गोल्ड, प्रिमियम गोल्ड पावडर मिसळली जात होती. तसेच या डेअरीत केमिकलच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी होती. परंतु अशा प्रकारच्या कारवाया करताना ते दिसत नाहीत. ही कारवाई पोलिसांनी केल्यानंतर पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करणे आवश्यक होते. परंतु एफडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे (अन्न व औषध प्रशासन विभाग) आज वेळ नसल्याने ते मंगळवारी कारवाईसाठी येणार आहेत : मल्हार थोरात (पोलीस उपनिरीक्षक, पालघर विशेष पथक)
Published at : 18 Feb 2019 07:11 PM (IST) Tags: fda news in Marathi today\'s news in marathi marathi news today Vasai

आणखी महत्वाच्या बातम्या

Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत; भाजपच्या मनात नेमकं काय?

Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत; भाजपच्या मनात नेमकं काय?

Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; डॉक्टरांची टीम पुन्हा तपासणीसाठी दाखल, दरेगावात काय घडतंय?

Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; डॉक्टरांची टीम पुन्हा तपासणीसाठी दाखल, दरेगावात काय घडतंय?

शपथविधी सोहळ्यासाठी भाजपकडून खास सूचना; महायुतीतील आमंत्रित पदाधिकार्‍यांसाठीचा कोटाही ठरला!

शपथविधी सोहळ्यासाठी भाजपकडून खास सूचना; महायुतीतील आमंत्रित पदाधिकार्‍यांसाठीचा कोटाही ठरला!

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 

Eknath Shinde Daregaon: एकनाथ शिंदे आज दरेगावातून ठाण्यात परतणार; महायुतीकडून कोणती पावलं उचलली जाणार?, संपूर्ण राज्याचं लक्ष

Eknath Shinde Daregaon: एकनाथ शिंदे आज दरेगावातून ठाण्यात परतणार; महायुतीकडून कोणती पावलं उचलली जाणार?, संपूर्ण राज्याचं लक्ष

टॉप न्यूज़

नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार

नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान

Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?

Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?

विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..

विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..