एक्स्प्लोर
मुंबईवरील हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर पोलिसांना अखेर बुलेटप्रुफ जॅकेट्स
![मुंबईवरील हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर पोलिसांना अखेर बुलेटप्रुफ जॅकेट्स 9 Years After 2611 Mumbai Police To Get Bulletproof Jackets Live Update मुंबईवरील हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर पोलिसांना अखेर बुलेटप्रुफ जॅकेट्स](https://static.abplive.com/abp_images/466190/thumbmail/mumbai%20police%20security.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई पोलिस दलाला अखेर अद्ययावत बुलेटप्रुफ जॅकेट्स मिळणार आहेत. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल 9 वर्षे उलटल्यानंतर मुंबई पोलिस दलाची मागणी पूर्ण केली जाणार आहे. कानपूरमधील मिलिट्री साहित्य पुरवणाऱ्या विभागातर्फे मुंबई पोलिस दलाला अशी पाच हजार जॅकेट्स पुरवली जाणार आहेत.
ज्या एके 47 रायफलनं कसाबसह इतर दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, त्या रायफलमधील गोळ्या झेलण्याची क्षमता या जॅकेटमध्ये आहे. प्रत्येक बुलेटप्रुफ जॅकेटची किंमत 32 हजार रुपयांच्या घरात आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुलेटप्रुफ जॅकेट्स घातलेलं असतानाही त्यांना गोळ्या लागल्या होत्या.
अनेक पोलिसांना या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्यामुळे मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या जॅकेटबद्दल शंका
वर्तवली जात होती. याच धर्तीवर एके 47, एके 56 अशा दमदार रायफलचेही वार झेलणाऱ्या जॅकेट्सची आता मुंबई पोलिस दलाकडून खरेदी करण्यात आली आहे.
16 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 मध्ये 110 बुलेटप्रुफ जॅकेट्स खरेदी करण्यात आली होती. मात्र हा आकडा अपुरा असल्याचं 26/11 च्या हल्ल्यानंतर समोर आलं. महाराष्ट्र पोलिस दलात दोन लाख कर्मचारी, अधिकारी असून, ते पाहता दोन हजार जॅकेट्स कमी पडण्याची भीती वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)