एक्स्प्लोर
भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू
भिवंडीतील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
![भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू 8 Year Old Boy Dies In Dogs Attack In Bhiwandi Latest Update भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18112303/bhiwandi_.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडी : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून फेणेपाडा येथील बंद पडलेल्या डम्पिंग ग्राउंडवर खेळण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
फेणेपाडा येथे राहणारा 8 वर्षीय धीरज यादव हा मित्रासोबत काल (रविवार) सकाळी 9 वाजेच्यादरम्यान डम्पिंग ग्राऊंडवर गेला होता. दरम्यान, यावेळी पाईपलाईनवरुन धीरजनं डम्पिंग ग्राऊंडवर उडी मारली. त्यावेळी तेथील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी या हल्ल्यात त्याच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या धीरजचा उपचाराआधीच मृत्यू झाला.
दरम्यान, भीतीपोटी धीरजचा मित्र पळून गेला आणि आपल्याला मार बसेल या भीतीनं त्यानं कोणालाही याबाबत सांगितलं नाही. 11.30च्या दरम्यान एक व्यक्तीनं तिथं घडलेला प्रकार पाहिला आणि याबाबत स्थानिकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धीरजला चिखलातून बाहेर काढत रुग्णालयात नेलं. मात्र, गंभीर जखमी झाल्यानं धीरजचा वाटेतच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)