एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची म्हाडाकडून घोषणा
मुंबईकरांना परवडणारी घरं मिळावी म्हणून 25 एकरात पाच हजार घरांचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : डोक्यावर हक्काचं छत असावं हे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याची मोठी संधी चालून आली आहे. कारण मुंबईतील गोरेगावच्या पहाडी भागात म्हाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारणार आहे.
मुंबईकरांना परवडणारी घरं मिळावी म्हणून 25 एकरात पाच हजार घरांचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2 हजार 855 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 952 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी तर 715 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी 537 सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
म्हाडाने घोषणा केलेला हा गृहप्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement