एक्स्प्लोर
सर्व्हे: मुंबईतील 40 टक्के तरुण नैराश्येच्या गर्तेत
पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशननं 6 महिन्यांच्या सर्व्हेतून हा निष्कर्ष काढला आहे.

मुंबई: मुंबईतील 20 ते 30 वयोगटातील तब्बल 40 टक्के तरुण नैराश्येच्या गर्तेत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र मुलांच्या या मानसिक स्थितीची माहिती केवळ 13 टक्के पालकांनाच आहे. पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशननं 6 महिन्यांच्या सर्व्हेतून हा निष्कर्ष काढला आहे. विशेष म्हणजे या सगळ्याचा परिणाम म्हणून तरुण फेसबुक किंवा इतर सोशल साईट्सवर अवलंबून आहेत. काही तरुण तर दिवसातले तब्बल 5-5 तास फेसबुक आणि पॉर्न साईट्सवर घालवत असल्याचं निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे. सर्व्हेतील निरीक्षण
- 38 टक्के तरुण मुलं कायम निराशेत असतात, तर 22 टक्के तरुणांना हा त्रास अधेमधे जाणवतो
- 49 टक्के महिला कायम निराश असतात तर 22 टक्के मुलींना वेळोवेळी लो फिलिंग जाणवतं
- 42 टक्के मुलांनी आणि 32 टक्के मुलींनी कुठलेही उपाय किंवा उपचार घेतलेले नाहीत
- 79 टक्के मुली त्यांच्या दिसण्यावर नाखूश आहेत, आणि त्यांना कॉस्मेटिक सर्जरी करायची आहे.
- केवळ 2 टक्के मुली आणि 8 टक्के मुलांना घरातून लैंगिक शिक्षणाचे धडे मिळाले आहेत.
आणखी वाचा























