एक्स्प्लोर
नवी मुंबईत इंजिनिअर पती, डॉक्टर पत्नीसह मुलीची आत्महत्या
नवी मुंबई : नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर पत्नीने लेकीसह आत्महत्या केल्याच्या धक्क्यातून इंजिनिअर पतीनेही आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 36 मध्ये इंद्र विहार सोसायटीत दत्ता कुटुंब भाड्याने राहत होतं. 45 वर्षीय डॉ. जास्मिन पटेल या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. याच नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
आपल्या पश्चात 15 वर्षीय मुलीचं काय होईल, या कुशंकेनं त्यांनी मुलगी ओशिनलाही आत्महत्या करायला लावली. तसा उल्लेख डॉ. जास्मिन यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. मायलेकीने रविवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपला देह केईएम रुग्णालयात अभ्यासासाठी दान करावा, अशी विनंतीही डॉ. जास्मिन यांनी सुसाईड नोटमध्ये केली आहे.
पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याचं पाहून पती इंद्रजित दत्ता यांनीही आयुष्य संपवण्याचं ठरवलं. आपली पत्नी आणि मुलीने गळफास घेतला होता, आपण त्यांचे मृतदेह खाली उतरवून ठेवत आहोत. आता आपल्यालाही आयुष्यात रस उरलेला नाही, असा तडकाफडकी निर्णय घेत दत्ता यांनीही आत्महत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement