एक्स्प्लोर

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!

कोकण रेल्वे मार्गावर 27 व 28 डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

मुंबई : दरवर्षी नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात व गोव्यात हजारो पर्यटक जात असतात. मात्र, यंदा या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. कोकण रेल्वेवर 27 डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे जवळपास 10 गाड्यांना थांबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्थानकावर लूप लाइनचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी 27 डिसेंबर मध्यरात्रीपासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान 28 डिसेंबर पहाटेपर्यंत आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या 10 गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. हेही वाचा - 'जुगार' ऑन व्हिल!, लोकलमधील 'खेळा'मागची कथा... नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीसाठी पर्टनाला येणाऱ्या पर्यटकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाताळच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या मेगाब्लॅकमुळे काही रेल्वे गाड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गाड्या आठ तासांच्या वेळेत थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. हेही वाचा - मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात, पुलावरून थेट रेल्वे रूळांवर कोसळली गाडी 12133 मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस, 16335 गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस, 22659 कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस, 10111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, 11099 एलटीटी-मडगाव डबलडेकर, 19331 कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, 50102 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर 50101 रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या दहा गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा - मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटला...

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget