एक्स्प्लोर

मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटला...

रेल्वेने प्रवास करताना एका तरुणाने मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

बीड : परळी रेल्वे स्थानकावर मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हैदराबाद पूर्णा रेल्वेमध्ये ही घटना घडली. सुतळी बॉम्ब फुटल्याचा आवाज इतका जोरात होता की ट्रेनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं. जखमी तरुणाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा - मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकावर बॉलिवुडची क्वीन फाडणार प्रवाशांची तिकीटं! सय्यद आक्रम, असं गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. पूर्णा हैदराबाद ट्रेनमधून आपली आई आणि बहिणीसोबत प्रवास करत होता. ट्रेन परळी रेल्वे स्थानकादरम्यान आल्यानंतर सय्यद टॉयलेटला जाण्यासाठी टॉयलेटमध्ये गेला. दरम्यान, सय्यदने आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब पकडून तो पेटवला. तो तोंडातच फुडल्यानं सय्यद गंभीर जखमी झाला. रेल्वे डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक बॉम्ब फुटलेला आवाज आल्याने डब्यातील प्रवाशांनी टॉयलेटकडे बघितले. त्यावेळी सय्यद जखमी अवस्थेत आढळून आला. या अपघातात मुलाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. हेही वाचा - पक्षाघाताशी लढण्यासाठी 'गोल्डन ऑवर' सेवा, इमरजन्सी अॅम्बुलन्सचे डॉक्टर उपचार देणार! घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तत्काळ जखमी मुलाला रेल्वेतून खाली आणले. परळी रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका रेल्वे स्थानकावर दाखल होत ते जखमी तरुणाला उपचारासाठी घेऊन गेले. सध्या या तरुणावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी सय्यद आक्रम हे मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहेत. सध्या सय्यदवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, तोंडात फुटलेला सुतळी बॉम्ब त्याच्याकडे कुठून आला? त्याने तो स्वतःहून पेटवला की अनावधानाने पेटला? या गोष्टींचा उलगडा सय्यद ठिक झाल्यानंतरच होणार आहे. हेही वाचा - नागपुरात ट्रकमधून तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास नालासोपाऱ्यात फटाक्यामुळे दोन कंपन्यांना भीषण आग | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget