एक्स्प्लोर
26/11 हल्ल्याचा साक्षीदार नरिमन हाऊसचं नाव बदललं!
हे मेमोरियल म्युझियम पाहण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. निवड झाल्यानंतर तारीख आणि वेळ प्रक्रियेद्वारे रजिस्टर केलेल्या व्यक्तीला कळवण्यात येईल.
मुंबई : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 26/11 हल्ल्याचा साक्षीदार असलेलं नरिमन हाऊसचं नाव बदलण्यात आलं आहे. नरिमन हाऊस आता नरिमन लाईट हाऊस या नावाने ओळखलं जाईल. नरिमन हाऊसचं नाव नरिमन लाईट हाऊस करुन दहशदवादाविरोधात नवी ज्योत पेटवण्यात आली आहे.
दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्यू धर्मियांचे मुंबईतील निवासस्थान छाबाड हाऊस अर्थात नरिमन हाऊसचं स्मारकात रुपांतर करण्यात आलं आहे. या ठिकाणी दोन दहशतवादी एके47 रायफलसह घुसले होते आणि त्यांनी अनेक निरपराधांचे प्राण घेतले होते. या ठिकाणी एक डीम लाईट लावण्यात येणार आहे.
26/11 मुंबई हल्ल्याच्या जखमांची दहा वर्षे
नरिमन हाऊसच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर झालेल्या या दहशदवादी हल्ल्याबाबत जाणून घेण्यासाठी आणि सर्व मृत आणि शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी मेमोरियल म्युझियम तयार करण्यात आलं आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांनाही 26/11 हल्ल्याच्या प्रसंगाचे क्षण अनुभवता येणार आहेत. हे मेमोरियल म्युझियम पाहण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. निवड झाल्यानंतर तारीख आणि वेळ प्रक्रियेद्वारे रजिस्टर केलेल्या व्यक्तीला कळवण्यात येईल.
घटनाक्रम : मुंबई हल्ला ते कसाबची फाशी
या दहशतवादी हल्ल्याच्या खुणा, ठसे आजही इथे पाहायला मिळतात. नरिमन हाऊसमध्ये प्रत्येक भिंतीच्या बाजूला माहिती देणारे पोस्टर, स्टँड लावण्यात आले आहेत. या इमारतीच्या सगळ्या भिंती आजही त्या काळरात्रीच्या थरारक आठवणी सांगत आहेत, असा अनुभव इथे आल्यावर मिळतो.
26/11 दहा वर्षांनंतर....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement