एक्स्प्लोर

Mumbai Police: 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला; तहव्वूर राणाविरोधात आरोपपत्र दाखल

26/11 Terrorist Attack Tahawwur Rana : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी तहव्वूर राणाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मुंबई :  मुंबईवर 26 नोव्हेंबर 2011 मध्ये (26/11 terror attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वूर राणाविरोधात (Tahhavur Rana) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) 405 पानी आरोपपत्र राणाविरोधात दाखल केले आहे. अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या राणाचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी हे पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

कॅनडाचे नागरिकत्व असलेला राणा हा सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. मे महिन्यात तहव्वूरचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्यात तहव्वूरचा राणाचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचाही कट रचण्यात समावेश होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्या निमित्ताने डेव्हिड हेडली हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला. मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन हेडली हा शिकागोला परतला होता. त्यानंतर त्याने मुंबईतील हे फोटो लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले. अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली होती.  डेव्हिड हेडली हा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

भारताने 10 जून 2020 रोजी तक्रार दाखल केली होती. तसेच तहव्वूर राणाला अटक करण्याची विनंतीही भारताने केली होती. त्यानुसार त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन प्रशासनाने राणाला भारतात पाठवण्यास पाठिंबा देत मान्यता दिली. भारत आणि अमेरिकेत दरम्यान प्रत्यापण करार आहे. त्या कराराअंतर्गत तहाव्वूर राण्याच्या प्रत्याप्रणाला मंजुरी मिळाली आहे. आता, आरोपपत्र दाखल झाल्याने त्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. 

तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे. पाकिस्तानी लष्करात असताना त्याने डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे. पाकिस्तानमध्ये राणा आणि हेडली यांची ओळख झाली होती. राणा हा 1997 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आणि जून 2001 मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. 

राणा आणि हेडली यांच्यावर 18 ऑक्टोबर 2009 रोजी प्रेषित मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणार्‍या जिलँड्स-पोस्टेनच्या कार्यालयावर हल्ल्याचा कट रचल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली.  त्यानंतरच्या चौकशीदरम्यान, राणा मुंबईला गेला होता आणि ताजमहाल पॅलेस आणि इतर ठिकाणी वास्तव्यास होता. याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget