एक्स्प्लोर
डोंबिवलीत दोन पोलिसांना बेदम मारहाण
डोंबिवली : डोंबिवलीमधील मानपाडा पोलिस स्थानकातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. कारमधील साऊंड सिस्टम बंद करण्यास सांगितल्याने चिडलेल्या तरुणांनी त्यांना मारहाण केली.
डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात रविवारी मध्यरात्री 1.30 ते 2.00 च्या सुमारास ही घटना घडली. या तरुणांनी रात्री कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टम सुरु ठेवला होता. त्यामुळे मानपाडा पोलिस स्टेशनच्या दोन पोलिसांनी त्यांना आवाज कमी करण्यास सांगितलं.
मात्र याचा राग मनात ठेवून चारही तरुणांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी किरण गायकवाड, अभिषेक त्रिवेदी, ओमकार गुंजाळ, समीर गायकवाड या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण पसार झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement