एक्स्प्लोर
Advertisement
महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध
मुंबई: मुंबईच्या विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उमेदवारीलाच स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. महापौर स्नेहल आंबेकर या वॉर्ड क्रमांक 198 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र त्या वॉर्डमधून आंबेकरांना उमेदवारी देऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते खासदार अनिल देसाई यांना निवेदन देणार आहेत.
वॉर्ड क्रमांक 198 नाही मिळाला तर स्नेहल आंबेकर कोणत्या वॉर्डमधून निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या समर्थकांनी किशोरी आंबेकर यांना 198 वॉर्डातून उमेदवारीला विरोध केला आहे.
वॉर्ड फेररचनेत बूथची अदलाबदल झाल्याने हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या समर्थकांनी आंबेकर यांना विरोध केला आहे.
वॉर्ड पुनर्रचनेचा मुंबई महापौरांना फटका
वॉर्ड नं. 194 मधून निवडून आलेल्या नगरसेविका आणि महापौर स्नेहल आंबेकर ह्या वॉर्ड पुनर्रचनेनंतर वॉर्ड नं. 198 मधून इच्छूक आहेत. मात्र, वॉर्ड पुनर्रचनेमुळे गेल्या निवडणुकीतील वॉर्ड नं. 191 आणि 194 मधले बूथ वॉर्ड नं. 198 मध्ये समाविष्ठ झाले.
वॉर्ड नं. 191च्या नगरसेविका किशोरी पेडणेकर या आहेत. त्यामुळे वॉर्ड नं. 198 मधून महापौर स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी स्थानिक महिला शिवसैनिक बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.
उद्या महिला उप शाखाप्रमुख आणि गटप्रमुख त्यांची नाराजी निवेदनाद्वारे खा. अनिल देसाई यांच्याकडे व्यक्त करणार आहेत.
वॉर्ड नं. 198 मधले इच्छूक उमेदवार:
दीनानाथ चौघुले, उप शाखाप्रमुख आणि स्थानिक आमदार सुनील शिंदे यांचे स्वीय सहायक
प्रकाश जळगावकर, उप शाखाप्रमुख
मयूर वनकर, भारतीय कामगार सेना सरचिटणीस
कृष्णा मेढेकर, दिवंगत नेते दत्ता नलावडे यांचे सहकारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement