ठाणेकर कुडकुडले, पारा 17 अंशांवर
ठाण्यात नाताळपासून पारा घसरत असून सरासरी किमान तापमान 20 अंश सेल्सियसवर तापमान पोहचले आहे.

ठाणे : ठाण्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी पारा 17 अंशावर घसरल्याने ठाण्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत असून या कालावधीत नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने आणि डॉक्टरांनी केले आहे.
ठाणे शहरात वाढत्या नागरीकरणाबरोबरच प्राकृतिक बदल देखील घडत आहेत. यंदा तर अवकाळी पावसानंतर हिवाळी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरणातील विचित्र बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो आहे. ठाण्यात नाताळपासून पारा घसरत असून सरासरी किमान तापमान 20 अंश सेल्सियसवर तापमान पोहचले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार, 25 डिसेंबरला किमान तापमान 20 अंश सेल्सियस, 26 डिसें.ला 22 अंश, 27 डिसें. रोजी 21 व 28 डिसेंबर रोजी कमाल 31आणि किमान 19 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेल्या थंडीची अनुभूती येत आहे. त्यात काल पासून ठाण्यातील तापमानाचा पारा हा चांगलाच खाली आला आहे. साधारणपणे 20 अंश सेल्सियस असणारा पारा मंगळवारी (29 डिसें.) तब्बल 17 अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे.
गेले दोन दिवस सकाळपासूनच हवेतील गारठा जाणवत होता. सकाळी फिरायला जाणारी मंडळी स्वेटर, कानटोप्यांचा आधार घेताना दिसत आहेत. साधारणत: दिवाळीच्या आधीपासून थंडी सुरू होते. यंदा मात्र थंडी काहीशी लांबली असून पहाटे साडेसहा वाजता किमान तापमान 17 अंशावर आल्याने ठाणेकर या सुखद गारव्याचा आनंद लुटताना दिसत होते.
ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नोंदवलेले 29 डिसेंबरचे रात्रीपासून सकाळ पर्यंतचे तापमान
रात्री ००:3० वाजता 21℃ रात्री 01:30 वाजता 20℃ रात्री 2:3० वाजता 19℃ रात्री 03:3० वाजता 17℃ रात्री 03:3० वाजता 17℃ रात्री 04:3० वाजता 18℃ पहाटे 05.30 वाजता 18℃ पहाटे 06.30 वाजता 17℃ सकाळी 07.30 वाजता 18℃
Nashik Temperature | नाशिकमध्ये गायब झालेली थंडी परतली; निफाडमध्ये 8.5 अंश से. तापमानाची नोंद
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















