एक्स्प्लोर
नवी मुंबई महानगरपालिका शाळेत 14 विद्यार्थिनींचा विनयभंग, आरोपी शिक्षकाला अटक
नवीमुंबईतील एका मनपा शाळेत संगणक प्रशिक्षकाने चौदा विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपीस अटक केले आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
![नवी मुंबई महानगरपालिका शाळेत 14 विद्यार्थिनींचा विनयभंग, आरोपी शिक्षकाला अटक 14 girl students molested at Navi Mumbai Municipal School teacher arrested नवी मुंबई महानगरपालिका शाळेत 14 विद्यार्थिनींचा विनयभंग, आरोपी शिक्षकाला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/13070712/rape.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईतील एका महानगरपालिकेच्या शाळेतील 14 मुलींचे विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेत संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच हे कृत्य केले आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलं आहे. लोचन परूळेकर असं त्या शिक्षकाचं नाव आहे. पालिका शाळेतील 6 वी ते 8 वी मधील विद्यार्थ्यांनींचा विनयभंग आरोपी शिक्षक लोचन परूळेकरने केला आहे. लोचन परूळेकर हा पालिका शाळेतील शिक्षक नसून तो खाजगी शिक्षक असल्याची माहिती आहे. पालिका शाळेला खाजगी संस्थाकडून एसआरए फंडाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या कंम्प्युटरचे शिक्षण देण्यासाठी त्याला संबंधित संस्थेने कामावर ठेवले होते. तो कंम्प्युटर क्लास घेण्यासाठी काही वेळ पालिका शाळेत येवून विद्यार्थ्यांना शिकवत होता, अशी माहिती आहे. यावेळी विद्यार्थ्यींनीना छेडने, कुठेही हात लावणे, अंगावरून हात फिरवणे असे प्रकार तो करायचा.
यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग
दोन महिन्यांपासून त्याचा हा घाणेरडा प्रकार सुरू होता. 15 तारखेला शाळेला सुट्टी असूनही एका विद्यार्थीनीला त्याने कंम्प्युटर शिकविण्याच्या बहाण्याने शाळेत बोलवले होते. यावेळी त्याच्या संशयित हालचाली बघून शाळेतील सिक्युरिटीच्या ही बाब लक्षात आल्यावर शाळा मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यात आली. याबाबतीत चौकशी केली असता 14 विद्यार्थींनींचा विनयभंग केला असल्याचे मुलींकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पालिकेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी आरोपी शिक्षक लोचन परूळेकरला अटक केली आहे.सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोचन हा गत दोन तीन महिन्यापासून विनयभंग करीत असून विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त प्रशिक्षणाच्या नावाखाली अनेकदा त्याने बोलावले. काही दिवसापूर्वी शाळेची सहल गेल्याने शाळा बंद होती. मात्र सहलीस अनेक विद्यार्थी गेले नव्हते. ज्या विद्यार्थिनी गेल्या नाहीत अशांना त्याही दिवशी लोचनने शाळेत प्रशिक्षणाच्या नावाखाली बोलावून घेतले. ही बाब शाळेच्या शिपायाला खटकली. त्यामुळे याबाबत त्याने शाळेतील काही शिक्षकांना कल्पना दिली. यात काही गडबड असू शकते अशी शंका आल्याने शाळेतील महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींना विश्वासात घेत विचारपूस केली असता विद्यार्थिनी बोलत्या झाल्या आणि सदर प्रकार उघडकीस आला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)