एक्स्प्लोर
हार्बर मार्गावर लवकरच 13 नव्या लोकल धावणार
मुंबई : मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर लवकरच 13 नव्या लोकल दाखल होणार आहेत. 2017 मध्ये टप्प्याटप्प्यानं या लोकल हार्बर प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. सध्या या लोकलच्या कोच बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एमयूटीपी-1 अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सिमेन्स लोकल धावू लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर एमयूटीपी-2च्या माध्यमातून 72 बंबार्डिअर लोकलही धावू लागल्या. एमयूटीपीच्या तिसऱ्या टप्प्यात हार्बर रेल्वेमार्गावर 13 लोकल चालवल्या जाणार आहेत.
या नव्या लोकलचं बांधणीचं काम चेन्नईच्या आयसीएफमध्ये सुरु आहे. हार्बर मार्गावर नव्या लोकल धावणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement