Trending News : या पृथ्वीतलावर काहीच अशक्य नाही. या पृथ्वीवर अनेक गोष्टी विचार करायला लावतील अशा घटना घडत असतात. माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल हे त्या माणसाला देखील माहित नसते. एका क्षणात, एका रात्रीत अनेक लोक फेमस होतात, कोट्यवधीचे आणि अब्जावधीचेही मालक होतात. मात्र हे तुम्ही ऐकले आहे का की एका माणसाची उंची ही अचानक इतकी वाढली की कोणालाच विश्वास बसणार नाही. 20 व्या शतकात एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले. तो जगातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती होता, कारण त्याने त्यांच्या आयुष्यात बरेच काही पाहिले पाहिले आणि नंतर तो जगातील सर्वात उंच व्यक्ती बनला. अचानक त्यांची उंची इतकी वाढली की तो 'द ग्रेट खली' पेक्षाही उंच झाला.


या अनोख्या माणसाचे नाव आहे, अॅडम रेनर जो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी होता. एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार अॅडमचा जन्म 1899 मध्ये ग्राझमध्ये झाला होता. त्यांच्या घरातील प्रत्येकाची उंची ही सामान्याच होती. मात्र त्याच्यासोबत वाढत्या वयात काही वेगळेच घडले. अॅडम फक्त 18 वर्षांचा होता तेव्हा त्याची उंची 4 फूट 6 इंच होती. लोक त्याला बुटका म्हणून चिडवत होते. तो काळ पहिल्या महायुद्धाचा होता. अॅडमलाही युद्धात लढण्याची हौस होती, म्हणून तो सैन्यात भरती होण्यासाठी गेला, पण तिथे त्यांची निराशा झाली. त्यांची उंची केवळ साडेचार फूट असून तो उंचीने लहान असल्याचे सांगून डॉक्टरांनी त्याला अनफिट ठरवले.


21 नंतर उंची वाढू लागली


रिपोर्ट्सनुसार, अॅडम 21 वर्षांचा झाला तेव्हा त्यांची उंची अचानक वाढू लागली आणि वाढतच गेली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा तो वयाच्या 30 व्या वर्षी पोहोचला तेव्हा त्याची उंची 7 फूट 2 इंच झाली होती, परंतु त्यांची उंची वाढवण्याची ही प्रक्रिया इथेच थांबली नाही, तर जेव्हा तो 50 वर्षांचा झाला तेव्हा तो 7 फूट 10 इंच झाला होता.


वयाच्या 51 व्या वर्षी झाले निधन


मात्र, वय आणि उंची वाढल्याने त्यांना अनेक शारीरिक समस्याही होऊ लागल्या. त्याच्या पाठीचा कणा वळला होता, त्यांना कानाने ऐकूही येत नव्हते आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली होती. अशा परिस्थितीत ते बेडवरच पडून राहू लागले आणि याच दरम्यान वयाच्या 51 व्या वर्षी त्यांचे अचानक निधन झाले.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Village of Widows : 'हे' आहे विधवांचं गाव, येथील बहुतेक पुरूषांचा मृत्यू; पण नेमकं कारण काय?