Wrestler Khali Joins BJP:  भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू आणि 'द ग्रेट खली' (The Great Khali) म्हणून ओळखल्या जाणारा दलीपसिंह राणानं (Dalip Singh Rana) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय.  पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 (Punjab Legislative Assembly Election 2022)  पार्श्वभूमीवर त्यानं भाजपचा झेंडा हाती घेतलाय. याबाबत एएनआय वृत्त संस्थेनं माहिती दिलीय. खलीचा भाजप प्रवेश पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. 


एएनआयचं ट्वीट-



खली जालंधर येथे काॉन्टिनेन्टल रेसलींग अॅकडमी चालवतात
खली हे मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. पंरतु, ते जालंधर येथे काॉन्टिनेन्टल रेसलींग अॅकडमी चालवतात. या अॅडकमीच्या माध्यमातून युवांना कुस्तीचं प्रशिक्षण देतात. खली राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. तसेच ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याआधी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. मात्र, काल त्यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांची भेट घेतली. ज्यामुळं खलींच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक वाढली होती. आज अखेर त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय. 


प्रंतप्रधानांच्या कामामुळं भाजपमध्ये प्रवेश
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खली म्हणाला की, भाजपमध्ये प्रवेश करून मला खूप चांगलं वाटतंय. तो म्हणाला की, डब्लूडब्लूईमध्ये मला नाव आणि संपत्तीची कमी नव्हती. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात आपणही का सहभागी होऊ नये? असा विचार माझ्या मनात आला. भारताला पुढे नेण्याचे भाजपचे धोरण आहे. त्यामुळं प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जर पक्षानं भविष्यात मला कोणतीही जबाबदारी दिली तर मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न असेल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha