Earn Money By Social Media : आजकाल सोशल मीडिया हा कमाईचा एक चांगला मार्ग आहे. लोक घरी बसून त्यांच्या व्हिडीओंमधून पैसे कमवत आहेत. कोरोनाच्या काळात घरात बसून व्हिडीओ बनवण्याची नवीन कला लोकांमध्ये आली आहे. Youtube वरून लोक नावासोबतच पैसेही कमवत आहेत . तुमच्यात व्हिडीओ बनवण्याचे टॅलेंट असेल तर तुम्ही तुमचे व्हिडीओ (YouTube Video) YouTube, Facebook, Instagram वर शेअर करुन लाखो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि काही ट्रिक वापरावी लागेल.


आजकाल प्रत्येकजण यूट्यूब तसेच इंस्टाग्राम सेलिब्रिटी बनत आहे. YouTube, Facebook, Instagram वर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. अशा प्रकारे, तुम्ही पैसे न गुंतवता घरी बसून सहज कमवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त YouTube , Insta, Facebook वर तुमचे स्वतःचे चॅनल तयार करावे लागेल. ज्याच्या मदतीने तुम्ही तेच तुमचे उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत बनवू शकता.


YouTube हे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.  यावर कोणीही व्हिडीओ अपलोड करू शकतो. हे एक पूर्णपणे विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. यूट्यूब ही Google ची सेवा आहे आणि Google च्या इतर सेवांप्रमाणे, प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तुम्हाला YouTube अॅप पहायला मिळते. त्यामुळे यूट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता जास्त आहे. सोबतच Facebook, Instagram वर देखील तुम्ही तुमच्या आवजडे व्हिडीओ शेअर करू शकता.


पैसे कसे कमवू शकतात


youtube वरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्हाला यात करिअर करायचे असेल तर तुम्हाला पैसे कमवण्याचे स्त्रोत माहित असले पाहिजे. Google Adsense हा YouTube वरून पैसे कमवण्याचा पहिला मार्ग आहे. YouTuber देखील फक्त Google Adsense द्वारे YouTube वरून पैसे कमवतो. सुरूवातीस तुम्हाला अकाउंट काढून तुमचा कन्टेंट त्यावर पोस्ट करायला लागेल. हे तुम्हाला नियमीत करावे लागेल. ज्यावेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्हि्युज मिळतील, तेव्हा व्हिडीओवर जाहिराती येऊ लागतील आणि पेैसे मिळायला सुरूवात होईल. जितके जास्त लोक तुमचा व्हिडीओ पाहतात तितकी कमाई जास्त असते. YouTube व्हिडीओमधून कमावलेले पैसे Google Adsense खात्यात येतात, जे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात.


इतर महत्वाच्या बातम्या


Success Story : कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI