Earth Tilted and it's Effect : जल ही जीवन है... पाणी हेच जीवन आहे, असं म्हटलं जातं. पृथ्वीवरील (Earth) जीवनात पाण्याचं (Water) योगदान सर्वात मोठं आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर सृष्टी आहे. पृश्वी हा ग्रह फक्त पाण्यामुळे जिवंत आहे. पण आता मानवाने हे पाणी पृथ्वीवरून काढून तिला एका बाजूला झुकवलं आहे. मानवामुळे पृथ्वी एका बाजूने पूर्वेकडे झुकली आहे. पृथ्वीचा जो एक तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. हीच पृथ्वी आज मानवाच्या एका कृतीमुळे एका बाजूला जास्त प्रमाणात झुकली आहे. याचा काय परिणाम होईल जाणून घ्या


नवीन संशोधन मोठी माहिती उघड


जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मानवाने पृथ्वीवरून पंपिंग करून मोठ्या प्रमाणात भूजल काढलं आहे. यामुळे 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, पृथ्वी 4.36 सेमी/वर्षाच्या वेगाने सुमारे 80 सेमी पूर्वेकडे झुकली गेली आहे. मोठ्या प्रमाणात भूजल काढल्यामुळे पृथ्वी ग्रह पूर्व दिशेकडे कललेला आहे. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स हे एजीयूचे जर्नल आहे. यामध्ये पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानांसंदर्भात माहिती प्रकाशिते केली जाते. सायटेक डेली वृत्तपत्रात याबाबतचही बातमी प्रकाशित झाली आहे.


मानवाने आतापर्यंत किती भूजल काढलं?


मानवाने पंपिग करुन वेगाने भूजल काढलं आहे. या संशोधन अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी यापूर्वी हवामान मॉडेल्सवर आधारित केलेल्या अंदाजानुसार, मानवाने 1993 ते 2010 पर्यंत 2,150 गिगाटन भूजल उपसलं, ही समुद्रसपाटीपासून 6 मिलिमीटर अधिक आहे. पण, शास्त्रज्ञांचा हा अंदाज अचूक अंदाज नाही, कारण त्याबद्दल अचूक माहिती देणे जवळजवळ अशक्य आहे.


 सर्वात जास्त भूजल कुठे काढलं गेलं?


या अहवालानुसार जगातील सर्वाधिक भूजल दोन प्रदेशांतून काढण्यात आले आहे. पहिला प्रदेश अमेरिकेचा पश्चिम प्रदेश आणि दुसरा प्रदेश भारताचा उत्तर-पश्चिम प्रदेश आहे. भारतात पंजाब आणि हरियाणामध्ये सिंचनासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अहवालानुसार, भूजलाच्या पुनर्वितरणामुळे रोटेशनल ध्रुवाच्या प्रवाहावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. कालांतराने पृथ्वीच्या रोटेशनल ध्रुवाच्या प्रवाहावर त्याचा मोठा परिणाम होतो. यामुळे पृथ्वी एका दिशेने कलली आहे.


याचा काय परिणाम होईल?


पृथ्वी एका बाजूने अधिक झुकल्याच याचा फार मोठा परिणाम होईल. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्या कालावधीवर परिणाम होईल. तसेच वर्षभरातील ठरलेल्या ऋतू चक्रावर परिणाम होईल, यामुळे हवामान आणि तापमानावर देखील परिणाम होईल.


संबंधित इतर बातम्या :


Sun : 'सूर्या' तुझा रंग कसा? पिवळा किंवा भगवा नाही असा दिसतो सूर्य, नासाने शेअर केला फोटो