एक्स्प्लोर

Mahayuti : जळगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा; शिवसेनेच्या किशोर पाटील पाठोपाठ भाजपचाही स्वबळाचा नारा, स्वतंत्र लढण्याचा राज्यातला पहिला निर्णय

Jalgaon News : जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे.

Jalgaon News : जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे बघायला मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Appa Patil) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, भाजपनेही (BJP) आता स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना (Shivsena) आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून जळगावमध्ये निवडणुकांपूर्वीच महायुती फिसकटली असून पाचोरा - भडगाव मतदारसंघात शिवसेना व भाजपचा जाहीरपणे स्वतंत्र लढण्याचा राज्यातला पहिला निर्णय असल्याचे बोललं जात आहे.

Mahayuti : युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ राज्यात पहिला

पाचोरा - भडगाव मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने भाजपच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे. किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे. पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हीही एकटे लढणार आहोत. अशी भूमिका मंगेश चव्हाण यांनी मांडली आहे.

Mangesh Chavan on Kishor Appa Patil : राजकारण हे हरिभक्त पारायणचे काम नाही

राजकारणात कोणी कोणाचं मित्र आणि शत्रू नसतं. राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो, तो परवाचा मित्रही असू शकतो. राजकारण हे हरिभक्त पारायणचे काम नाही, राजकारणात कोणीतरी शत्रू राहील, कुणीतरी सोबत राहणार. किशोर पाटील आणि मी सरकारमध्ये आहे, महायुतीचा घटक आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी अगदी टोकाचे बोलणं मला योग्य वाटत नाही. किशोर पाटील यांनीही काही गोष्टी सांभाळून बोलल्या तर बरं होईल. विधानसभेला त्यांचा फॉर्म भरायला मी ज्युनिअर आमदार असताना आलो होतो. ते एकही उदाहरण दाखवू शकत नाही की आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. असे म्हणत भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना टोला लगावला.

पक्ष वाढवण्यासाठी जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावे लागेल. आमच्या सोबत जे लोक येतील, आमच्या विचारांशी अनुरूप असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. युतीत लढण्याविषयी मी किशोर पाटील यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडून नकार आल्यानंतर आम्हाला प्रस्ताव पुढे न्यावा लागत आहे. त्यांचा निर्णय झाल्यामुळे किशोर पाटील वेगळे लढत आहे आणि आम्ही वेगळे लढत आहोत. यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघात भाजप आणि शिवसेना वेगवेगळे स्वबळावर लढणार आहे. हे चित्र फक्त पाचोरा आणि भडगाव मतदार संघात पुरता मर्यादित आहे. जिल्हा संदर्भात अजून नेत्यांनी कुठलेही भूमिका स्पष्ट केलेले नाही. असेही भाजप आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

Mangesh Chavan : आमच्याकडून कधीही सर्वांसाठी युतीचे मार्ग खुले

किशोर पाटील यांच्या विषयी मला गिरीश भाऊंनी आणि पक्षाने जे जे सांगितलं मी ती भूमिका पार पाडली. एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही. भारतीय जनता पार्टीच्या 20 कार्यकर्त्यांपैकी 17 कार्यकर्त्यांनी किशोर पाटलांचे काम केले आहे. कितीतरी आमचे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांनी त्यांचं काम केलं आहे. किशोर पाटील यांचा समज गैरसमजातून निर्माण झाला आहे. त्याला आपण काय करणार. आमच्याकडून कधीही सर्वांसाठी युतीचे मार्ग खुले असतात. किशोर पाटील यांनी काही प्रस्ताव दिला, पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते. असेही मंगेश चव्हाण म्हणाले.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget