एक्स्प्लोर

Majha Impact | शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर 'कँडीक्रश', विभागाने चूक सुधारली

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकवर क्लिक केल्यावर कँडीक्रश गेम सुरु होत होता. या प्रकाराने शेतकरी संतापले होते. हा प्रकार एबीपी माझाने पहिल्यांदा निदर्शनास आणून दिला. त्यानंतर विभागाला जाग आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही लिंक उघडल्यावर कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. हे वृत्त एबीपी माझाने दाखवल्यानंतर सरकारी विभाग खडबडून जागं झालं आहे. कॅंडी क्रशच्या लिंकला सहकार विभाग जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारची सगळी यंत्रणा जागी झाली. यानंतर संबंधित यंत्रणेनं नेमकं काय झालं याची चौकशी केली. कृषी सन्मान योजनेची लिंक उघडताच कँडीक्रश हा गेम का सुरू होऊ लागल्याची दिवसभर तपासणी केली आणि त्यानंतर त्यात दुरुस्ती करुन आता सुधारित लिंक पाठवल्या आहेत. कृषि विभागाच्या आयुक्तांनी यासंबंधी माहिती देताना म्हटलं आहे की, आता जी लिंक दिली आहे ती योग्य आहे. या योजनेची सर्व माहिती त्या लिंकवर मिळेल. सहकार विभागाला देखील तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सुधारित लिंक जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले आहेत. लिंक आणि 2019 यात स्पेस आल्याने ही चूक झाली असल्याचे विभागाने कळवले आहे. किसान पोर्टलवरुन प्रत्येक शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात येतो. यावरुन हवामान, पावसाचा अंदाज, शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना, पिकांवरील रोग, रोगांवर करण्यात येणाऱ्या उपायांवरील मार्गदर्शन, तापमान आदींची माहिती देण्यात येत असते. याच पोर्टलवरुन कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव योजनेत आहे किंवा नाही, याची माहिती घेता येते. मात्र ही लिंक उघडताच कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचे निदर्शनास आले होते. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 - योजनेनुसार, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. या कर्जमुक्ती योजनेचे निकषही या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत, असा निकष या शासन निर्णयात लावण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून जुलैचा नवा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून जुलैचा नवा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget