एक्स्प्लोर

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन की ऑफलाईन? तीन मार्चला येणार अभ्यास गटाचा अहवाल

बदल्यांमध्ये पारदर्शकता राहण्यास मदत होईल म्हणून राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय गेल्या फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र आता या निर्णयावर ठाकरे सरकार पुनर्विचार करत आहे.

मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायच्या या संदर्भातला अभ्यास गटाचा अहवाल तीन मार्चला सादर होणारं आहे. बदल्या कशा प्रकारे केल्या जाव्यात या संदर्भात पाच सीईओंचा एक अभ्यासगट अभ्यास करुन अहवाल तयार करत आहे. आता हा बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल याची शिक्षकांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले आहे. या बदल्या ऑफलाईन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडी प्रमाणे जनभावना लक्षात न घेता हा निर्णय देखील बदलला जाण्याची शक्यता आहे. ऑनलाईनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला आहे. मंगळवारी 25, फेब्रुवारीला राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूर आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांची 99 टक्के मतं ही बदल्या ऑनलाईनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूने व्यक्त झाली. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द होण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडे पुन्हा अधिकार देण्याच्या हालचाली अभ्यास गटासमोर आलेले चर्चेचे मुद्दे ऑनलाईन बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत का? पती पत्नी एकत्रिकरणाचे अंतर हे तीस किमीवरून पन्नास कमी करावे का? अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावेत बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणार्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा. राज्यातल्या शिक्षक संघटनांची 99 टक्के मत ऑनलाईन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत . बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. संघटनांची बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरी थांबली होती. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशा मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सरकारला दिले आहे. शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे राज्य शासनाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे नवे धोरण ठरविण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भाचा अभ्यास गट नेमला आहे. त्यात पुणे, रायगड, चंद्रपूर, नंदूरबार आणि उस्मानाबादचे सीईओ सदस्य आहेत. हा अभ्यासगट तीन मार्चला सरकारला आपला अहवाल सादर करेल. रोहित पवारांचे यांचे ऑफलाईन बदल्यांना समर्थन ? रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या 10- 15 वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामना करावा लागतो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, तर दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही देखील होत आहेत असे रोहित पवार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . पंकजा मुंडे यांनी घेतला होता निर्णय राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, असं म्हणत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेताना सांगितलं होतं.
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!

व्हिडीओ

Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Embed widget