एक्स्प्लोर
धुळ्यात 50 हजारांची लाच घेताना जि. प. अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

धुळे: धुळ्यात 50 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिपाईला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. अधिकारी शेखर रौंदळ आणि शिपाई संजय बोरसे अशी त्यांची नावं आहे. २०१६ मध्ये पदोन्नती प्रकरणात लाचलुचपत विभागाकडे असलेल्या पुराव्यांवर कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेतली. धुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत 50 हजारांची लाच घेताना नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे.
आणखी वाचा























