एक्स्प्लोर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना टोलनाक्यावर शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की

ओळखपत्र मुदतीच्या बाहेर गेल्याचे निदर्शनास आणून दिल्याने नाक्यावरील कर्मचारी संतप्‍त झाले. आम्ही तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ शकतो, असे म्हणून त्यांनी मित्तल यांना शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की केली.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे  कामकाज आटोपून निघालेल्या कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता किणी टोल नाक्यावर घडली. याप्रकरणी टोल कर्मचारी विजय शामराव शेवडे (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याच्यासह एका कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल आणि त्यांचे सहकारी अधिकारी इस्लामपूरला निवडणुकीच्या कामकाजानिमित्त गेले होते. रात्री उशिरा ते शासकीय गाडीतून कोल्हापूरकडे येत होते. किणी टोल नाक्याच्या लेन क्रमांक सातवर टोल कर्मचार्‍याने त्यांची गाडी अडवली. यावेळी कर्मचारी विजय शेवडे याने टोल देण्याची मागणी केली. VIDEO | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना टोलनाक्यावर शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की | एबीपी माझा यावेळी गाडीत पुढच्या सीटवर बसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, ही गाडी शासनाची असून, आम्ही सर्वजण शासकीय अधिकारी आहोत. मात्र, शेवडे याने आपले ओळखपत्र दाखवा, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यानंतर हे चालत नाही, असे जुजबी उत्तर देऊन टोल भरावा लागेल, असा अट्टाहास त्याने धरला. यावेळी मित्तल यांना या टोल नाक्याच्या मॅनेजरने देखील हे ओळखपत्र चालत नसल्याचे सांगितले. दरम्यान, मित्तल यांनी मॅनेजरचे ओळखपत्र पहिले. तेच ओळखपत्र मुदतीच्या बाहेर गेल्याचे निदर्शनास आणून दिल्याने नाक्यावरील कर्मचारी संतप्‍त झाले. आम्ही तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ शकतो, असे म्हणून त्यांनी मित्तल यांना शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की केली. यानंतर मित्तल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वडगाव पोलीस ठाणे गाठले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांनी टोल व्यवस्थापन आणि कर्मचारी शेवडे याच्यासह एका कर्मचार्‍याविरुद्ध फिर्याद दिली आहे. दरम्यान, या टोल नाक्यावर अशिक्षित, गुन्हेगारी वृत्तीचे कर्मचारी नेमले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावणार असल्याचे एका अधिकार्‍याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. VIDEO | सातारा: उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात वादावादी

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'आम्ही वारंवार आंदोलन करायची अन् सरकारनी हलक्यात घ्यायचं, असे असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना...; मनोज जरांगे संतापले
'आम्ही वारंवार आंदोलन करायची अन् सरकारनी हलक्यात घ्यायचं, असे असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल'; मनोज जरांगे संतापले
Rohit Pawar on Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या सावित्रीबाईं फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत; म्हणाले 'थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी...'
अमोल कोल्हेंच्या सावित्रीबाईं फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत; म्हणाले 'थोर विचारांना पुढे नेताना अनेक अडचणी...'
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
NCP Sharad Pawar Camp Vardhapan Din 2026: 'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget