एक्स्प्लोर

गाडीला कट मारल्याने तरुणाची डोक्यात रॉड घालून हत्या

गाडीला कट का मारला म्हणून डोक्यात टॉमी घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडणूर या गावात ही घटना घडली आहे.

 सांगली : गाडीला कट का मारला म्हणून डोक्यात टॉमी घालून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडणूर या गावात ही घटना घडली आहे. सिद्धनाथ बाबासो सरगर (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घडलेल्या या खुनाच्या घटनेने जत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डफळापूरनजीक असलेल्या कुडनूर या गावचा रहिवाशी असलेला सिद्धनाथ सरगर हा कुडनूर- शिंगणापूर मार्गावरील सरगर वस्ती येथे राहत होता. बुधवारी रात्री खांडेकर वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला सिद्धनाथचा मयत अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिद्धनाथच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मेंदू बाहेर आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी सिद्धनाथचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सिद्धनाथचा खून त्याच्याच गावातील प्रमोद खांडेकर या तरुणाने केला असल्याचे त्याच्या मामांनी पोलिसांना सांगितले. प्रमोद स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. घटना काय? काल सायंकाळी सात वाजता प्रमोद हा त्याची आयशर गाडी घेवून रस्त्याने जात होता. त्यावेळी सिद्धनाथने आयशरला कट मारला व तो पुढे निघून गेला. सिद्धनाथ हा खांडेकर वस्तीजवळ मोबाइलवर बोलत थाबलेला असताना प्रमोदने आयशरमधील टॉमी सिद्धनाथच्या डोक्यात घातली. या माराने सिद्धनाथचा मेंदू बाहेर येवून पडला व तो जागीच ठार झाल्याचे प्रमोदच्या मामाने पोलिसांना सांगितले. रात्री उशीरापर्यत प्रमोद पोलीस ठाण्यात हजर झाला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget