एक्स्प्लोर

गर्लफ्रेण्डसाठी तरुणाने पुणे विमानतळाची सुरक्षा भेदली!

पुणे : प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं, अशाप्रकारचे डायलॉग सिनेमात ऐकायला मिळतात. अनेक वेळा हे प्रेमवीर कायद्याचं उल्लंघनही करतात. पुणे विमानतळावर रविवारी असाच एक प्रकार घडला. सीआयएसएफने एका प्रेमवीराला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने कायद्याचे धिंडवडे उडवून विमानतळावरचा सुरक्षा भेदली. बनावट तिकीटद्वारे विमानतळाच्या उच्चदर्जाची सुरक्षा असलेल्या टर्मिनल बिल्डिंगपर्यंत पोहोचला. कारण ऐकून सुरक्षारक्षकांनाही धक्का त्याच्या या खटाटोपाचं कारण ऐकल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गर्लफ्रेण्डला गूडबाय करण्यासाठी टर्मिनल बिल्डिंगपर्यंत घुसल्याचं या प्रेमवीराने सांगितलं. त्याच्याविरोधात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमर मोहसिन बॉक्सवाला असं या तरुणाचं नाव असून तो मार्केट यार्डमधील बुरहानी कॉलनीत राहतो. तिकीटात हेराफेरी करुन विमानतळावर घुसला 26 वर्षीय अमर मोहसिन बॉक्सवालाने चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटच्या एक वर्षापूर्वीच्या तिकीटात हेराफेरी केली. त्यानंतर रविवारी सकाळी 11 वाजता तो पुणे विमानतळावर घुसला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, "त्याची गर्लफ्रेण्ड स्पाईसजेटच्या विमानतून पुण्याहून गोव्याला जात होती. सुरक्षा तपासणीतून गेल्यानंतर बॉक्सवाला डिपार्चर एरियामध्ये गेला. तिथे त्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला मला चेन्नईला जायचं नाही. त्यामुळे बाहेर जाऊ द्या, अशी विनंती केली. प्रवास न करताच परतत असल्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला त्याच्यावर संशय आला होता. एअरलाईन्सच्या काऊंटरवर जाऊन त्याच्या तिकीटाची तपासणी केली. तिकीट बनावट असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिस त्याची चौकशी करत आहेत." स्पाईसजेटचं (SG 514) पुणे-गोवा विमान पुणे विमानतळावरुन 12.20 मिनिटांनी सुटणार होतं. तर चेन्नईला जाणारं (6E 302) हे इंडिगोचं विमान 1.50 मिनिटांनी उड्डाण करणार होतं. अमर मोहसिन बॉक्सवाला सकाळी 11 च्या सुमारास टर्मिनल बिल्डिंमध्ये घुसला, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशातील अतिमहत्त्वाचं पुणे विमानतळ पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचं विमानतळ मानलं जातं. इथली सुरक्षाव्यवस्था कडेकोट असते. पण तरुणाच्या प्रतापामुळे सुरक्षा यंत्रणेची पोलखोल झाली आहे. त्यासोबतच सुरक्षेच्या पद्धतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा अहवाल मागवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Nashik News: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Embed widget