एक्स्प्लोर
माजी नगरसेविकेच्या मुलाची गुंडगिरी, ओव्हरटेक केल्याने तरुणाला मारहाण
‘तू कोणाच्या गाडीला ओव्हरटेक केलंय, हे माहीत आहे का?’ असं म्हणत निम्हण दाम्पत्याचा अल्पवयीन मुलगा वरुणला मारहाण करत होता.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि माजी नगरसेविका सुषमा निम्हण या दाम्पत्याच्या 17 वर्षीय मुलाची गुंडगिरी समोर आली आहे. औंध भागात निम्हण दाम्पत्याच्या मुलाने वरुण देसाईन नामक तरुणाला मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यात वरुण देसाई या तरुणाचे नाक फ्रॅक्चर झाले आहे.
वरुण देसाईच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवरील मारहाणीच्या खुणांमुळे त्याला किती जबर मारहाण झाली आहे, हे दिसून येते. एवढंच नव्हे, तर या मारहाणीत वरुणच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्याने त्याचं ऑपरेशन देखील करावं लागणार आहे.
वरुणची चूक फक्त इतकीच होती की, त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि सुषमा निम्हण यांच्या 17 वर्षीय मुलाच्या कारला ओव्हरटेक केलं. त्याचा राग येऊन निम्हण यांच्या मुलाने त्याच्या इतर तीन अल्पवयीन साथीदारांसह वरुणला बेदम मारहाण केली.
‘तू कोणाच्या गाडीला ओव्हरटेक केलंय, हे माहीत आहे का?’ असं म्हणत निम्हण दाम्पत्याचा अल्पवयीन मुलगा हा वरुणला मारहाण करत होता.
गुंडगिरी करणाऱ्या या मुलाचे वडील प्रमोद निम्हण हे 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते, तर त्याची आई सुषमा निम्हण 2011 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका होत्या. मात्र गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रमोद निम्हण यांचा पराभव झाला होता.
प्रमोद निम्हण आणि सुषमा निम्हण
पोलिसांनी या प्रकरणात प्रमोद आणि सुषमा निम्हण यांच्या मुलाला त्याच्या आणखी एका साथीदारांसह अटक केली आहे. बाल न्यायालयापुढे त्यांना उभं केलं जाणार असून त्याच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते आहे.
निम्हण यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा तर नोंद आहेच. मात्र 17 वर्षांच्या या मुलाकडे चारचाकी वाहन देणाऱ्या त्याच्या आई-वडिलांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून जाहीरपणे लोकांना सल्ले आणि सूचना दिल्या जातात. परंतु त्याची सुरुवात या नेत्यांनी स्वतःच्या घरातून करण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement