एक्स्प्लोर
येवला-मनमाड रोडवर तिहेरी अपघात, सातजणांचा मृत्यू
येवल्या तालुक्यात ट्रॅक्स, दुचाकी आणि एसटीच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिक : येवल्या तालुक्यात ट्रॅक्स, दुचाकी आणि एसटीच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण त्यातील काहींची प्रकृतीची गंभीर असल्याने अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
येवला - मनमाड रोडवरील संध्याकाळी 6.30 वाजता ट्रॅक्स, दुचाकी आणि एसटीबसचा अपघातात झाला. ट्रॅक्स आणि दुचाकीची जोरदार धडक झाली.. आणि ट्रॅक्स थेट एसटीवर जाऊन आदळली.
या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement