एक्स्प्लोर

वाघिणीच्या पावलांचे ठसे शोधत गेले आणि तरसाची पिल्लं सापडली

अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते ठसे तरसाचे निघाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली असता कपाशीच्या शेतात दोन पिल्लं आढळली.

यवतमाळ : यवतमाळमधल्या नरभक्षक वाघिणीचा ‘लांडगा आला रे आला’ अशी गत झालीय. कारण, वडकी - कारेगावमध्ये या वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळल्याची बातमी आली आणि वन विभागाचे अधिकारी वाघिणीच्या शोधासाठी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते ठसे तरसाचे निघाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली असता कपाशीच्या शेतात दोन पिल्लं आढळली. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी - कारेगाव परिसरात तरसाचे हे दोन पिल्लं आढळून आले. वन विभागाला याची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात आले. कारेगाव भागातील शेतकरी सुहास तेलतुंबडे यांच्या कपाशीच्या शेतात हे दोन पिल्लं आढळले. दोन पिल्लांसह त्यांची आई (मादी) तरसही सोबत होती. शेतात कापूस वेचणी करत असलेल्या मजूर महिलांना पाहून तरस मादीने त्यांच्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजुरांची संख्या जास्त असल्याने त्या मादीने पळ काढला. पण पिल्लं लहान असल्याने त्यांना पळता आलं नाही. सदर पिल्लं हे पाच दिवसांचे असल्याचं वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण पावलांच्या ठशावरुन वाघिणीचा शोध घेण्याचा अंदाज चुकल्याचं दिसत आहे. वन विभागाने या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. याच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जात असली तरीही अद्याप या शोधमोहीमेला यश आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Embed widget