एक्स्प्लोर

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी अजूनही काही कालावधी लागणार

9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे. चिपी विमानतळाची नुकतीच केंद्राच्या DGCA पथकाने पहाणी केली होती. DGCA च्या नियमाचे तंतोतंत पालन झालं नाही तर चिपी विमानतळ महाराष्ट्र एव्हिएशनच्या ताब्यात घेण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू असून दिल्लीत 9 मार्चला एव्हिएशनच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभाग अजूनही काही प्रमाणात खराब झाला असल्यामुळे अजून काही कालावधी विमानतळ सुरू होण्यासाठी लागेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. DGCA अध्यापही धावपट्टी बाबत समाधानी नाही. प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीची धावपट्टी वरील पृष्ठभाग तयार झाला पाहिजे तसा तयार झाला नसल्याने DGCA ने प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे चिपी विमानतळ अजून काही काळ लांबणीवर गेल्याच चित्र आहे. 9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

चिपी विमानतळ पूर्ण झालेला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर चिपी विमानतळाचं लोकार्पण करणार आहे. गेल्या महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यासाठी इच्छा होती. मात्र तांत्रिक बाबी मुळे थोडासा उशीर होत आहे. पाठपुरावा चाललंय, लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरू करणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विमानतळासाठी मूलभूत लागणाऱ्या सुविधा रस्ता, इंटरनेट, पाणी या तीन गोष्टी पूर्ण होतील, त्यावेळी मी स्वतः मंत्र्यांना सांगेन परवानगी त्वरित द्या. या बाबी पूर्ण केल्याशिवाय कसं काय विमानतळ सुरू होईल. या बाबी पूर्ण करणं राज्य सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्याना विमानतळ सुरू करण्यासाठी घाई झाली आहे. तारखा जाहीर करण्याची स्पर्धा लागली आहे, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं.

राज्य सरकारने करारात दिलेल्या सुविधा पुरवल्या नसल्याने विमानतळ सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासदार चिपी विमानतळ सुरु करणार म्हणून खोट सांगून जनतेला फसवत आहेत. चांगला मुहूर्त काढणारा माणूस बघून चिपी विमानतळाचा मुहूर्त काढून घ्यावा, अशी टीका मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धसपूस सुरूच; वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ उतरली; सोशल मीडियावर नाच्या 'ट्रेंड' राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धसपूस सुरूच; वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ उतरली; सोशल मीडियावर नाच्या 'ट्रेंड' राजकीय वर्तुळात चर्चा
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget