Work From Office :  कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करुन कंटाळलेल्या ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे.  आता ऑफिसमध्ये कामाचे 12 तास लागू होणार आहेत आणि हातातील पगार कमी होऊ शकतो कारण मोदी सरकार 2022 पासून कामगार संहितेचे नवे नियम लागू करण्याच्या विचारात आहे.


मोदी सरकारला कामगार कायद्यातील सुधारणा या वर्षापासून लागू करायच्या आहेत. कामगार सुधारणा लागू करण्यात विलंब झाला असला तरी, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय 2022 मध्ये चार श्रम संहिता लागू करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, कामगार संहिता लागू होण्यापूर्वी मंत्रालय प्रत्येक राज्याला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कोणतीही अंतिम मुदत देणे कठीण आहे, 2022 पर्यंत सर्व चार कामगार संहिता लागू होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली


भारतातील 29 केंद्रीय कामगार कायदे 4 कोडमध्ये विभागलेले आहेत. संहितेच्या नियमांमध्ये 4 श्रम संहिता जसे की वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाची परिस्थिती इ. आतापर्यंत 13 राज्यांनी या कायद्यांचा मसुदा तयार केला आहे.


या चार संहिता संसदेने संमत केलेल्या आहेत, परंतु केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारांनाही या संहिता, नियम अधिसूचित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच हे नियम राज्यांमध्ये लागू होतील. हे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार होते, परंतु राज्यांची तयारी पूर्ण न झाल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले.


कामगार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर काय बदल होतील


हातात असलेला पगार कमी होईल


कामगार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कर्मचार्‍यांच्या हातातील वेतन कमी होईल आणि कंपन्यांना उच्च पीएफ दायित्वाचा भार सहन करावा लागेल. नवीन मसुदा नियमानुसार, मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50% किंवा त्याहून अधिक असावे. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल होणार आहे. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे, पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापलेली रक्कम वाढेल कारण यामध्ये शिल्लक पैसे मूळ वेतनाच्या प्रमाणात आहेत. असे झाल्यास तुमच्या घरी येणारा पगार कमी होईल, निवृत्तीनंतर मिळणारे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे पैसे वाढतील.


4 दिवसांची नोकरी, 3 दिवस सुट्टी


नवीन मसुदा कायद्यात कमाल कामाचे तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. जर तुम्ही 12 तास काम केले तर तुम्हाला आठवड्यातून 4 दिवस काम करावे लागेल आणि 3 दिवस सुट्टी मिळेल. सध्याच्या नियमानुसार, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ ओव्हरटाईमसाठी पात्र मानला जात नाही. या मसुद्यात कोणत्याही कर्मचाऱ्याला 5 तासांपेक्षा जास्त वेळ काम करण्यास मनाई आहे. कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्धा तास विश्रांती द्यावी लागणार आहे.


संबंधित बातम्या :


अरेच्चा! हा पठ्ठ्या करायचा एकाच वेळेस सात आयटी कंपन्यांमध्ये काम, पीएफ खात्यामुळे कर्मचाऱ्याचा भांडाफोड


WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड


ऑफिस कामकाजाच्या वेळेनंतर बॉसकडून कर्मचाऱ्याला फोन, मेसेज करणं बेकायदेशीर! 'या' देशात बनला कायदा...