Work From Home in Corona : जागतिक महामारी कोरोनामुळे कामकाजाच्या जीवनात अभूतपूर्व बदल होत असताना, आता लोक ऑफिसला जाण्याऐवजी घरी राहून काम करण्याला प्राधान्य देत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. रोजगाराशी संबंधित वेबसाईट सायकीच्या 'टेक टॅलेंट आऊटलूक' अहवालानुसार, महामारीमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांवर घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची वेळ आली. मात्र आता ही नवीन पद्धत ट्रेंड बनली आहे. या वर्क फ्रॉम होमच्या सवयीने लोकांच्या जीवनात वेगळं स्थान निर्माण केले आहे.


या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही आणि घरून काम करायचे आहे. 'टॅलेंट टेक आउटलुक' (Talent Tech Outlook) 2022 चार खंडांमधील 100 हून अधिक अधिकारी आणि एचआर एक्झिक्युटिव्हकडून मिळालेल्या प्रतिसादांचे विश्लेषण करते. सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


घरून काम करताना कामाचा ताण कमी
अभ्यासात सहभागी असलेल्या 64 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, घरून काम केल्याने त्यांची उत्पादकता वाढते आणि तणाव कमी होतो. दरम्यान, 80 टक्क्यांहून अधिक एचआर व्यवस्थापकांनी सांगितले की त्यांच्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात जाणारे कर्मचारी शोधणे कठीण होत आहे.


67 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी असेही म्हटले की त्यांना ऑफिसमध्ये काम करणारे लोक शोधणे कठीण होत आहे. बदललेल्या वातावरणात, घरून काम करणे हा पर्याय न राहता नवीन ट्रेंड बनला आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे लोकही त्यांच्या मालकाकडून ही अपेक्षा करतात. 



इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha