Nana Patole : नागपुरात भाजपचा (BJP) एक वरिष्ठ नगरसेवक फोडून त्याला काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश देणारे नाना पटोले (Nana patole) आज कमालीचे खुश होते... सोमवारी क्वार्टर परिसरात जाहीर सभेच्या माध्यमातून नाना पटोले यांनी भाजपवर कठोर प्रहार केले. मात्र, सभास्थानापासून त्यांची पाठ फिरताच एक वेगळेच चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. सभास्थानी आलेल्या किंबहुना आणल्या गेलेल्या या महिलांना सभा झालेल्या उद्यानात "खास कुपन" वाटले गेले... पाहूया काय आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेतील कूपनचे रहस्य....  

  


काय आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेतील कूपनचे रहस्य?


प्रचंड गर्दीत एकमेकींशी रेटारेटी करणाऱ्या या सर्व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्या सकाळी किती वाजता यायचे आहे असे विचारतात आणि प्रतिउत्तरात काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व महिलांच्या हातात एक एक कुपन ठेऊन उद्या सकाळी 9 वाजता या असे सांगतात....सभा स्थान सोडताना हातात मिळणारे हे कुपन आणि उद्या सकाळी 9 वाजता या... नेमके हे प्रकरण आहे तरी काय? असे प्रश्न तुम्हाला पडले असेल... तर ही घडामोड आहे नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातली... आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक सभा सोमवारी क्वार्टर परिसरात जयंतराव लुटे उद्यानात पार पडली. भाजपचे नगरसेवक सतीश होते यांनी आज भाजपला रामराम करत काँग्रेस मध्ये प्रवेश केले. नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सतीश होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला.. या वेळी मोठ्या प्रमाणावर महिलांना सभास्थानी आल्या होत्या... महिलांची प्रचंड गर्दी पाहून नाना पटोले हेही उत्साहित झाले... ही तर फक्त सुरुवात आहे... लवकरच अनेक भाजप नेते काँग्रेसमध्ये येतील असा दावा त्यांनी केला... 


पटोलेंची पाठ फिरताच सभेचा वेगळाच चेहरा समोर


मात्र, नाना पटोले यांची पाठ फिरताच या सभेचा वेगळाच चेहरा समोर आला... महिला बसलेल्या उद्यानाच्या तीन बाजूच्या दाराना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुलूप लावले ( कोणी बाहेरची महिला उद्यानाच्या आत प्रवेश करणार नाही यासाठी )... फक्त एक दार उघडण्यात आले... त्यानंतर सुरु झाले खास कूपनचे वाटप... "वार्डाचा विकास हेच आमचे ध्येय" राजकारणाचा चांगुलपणा दाखवणारा वाक्य लिहिलेल्या या कूपनचा खरा ध्येय मात्र वेगळाच होता. सभेत आणल्या गेलेल्या महिलांना त्यांचा मोबदला देण्यासाठी हे कुपन दिले गेले. एबीपी माझाने काँग्रेस कार्यकर्त्यांना कूपनचा कारण विचारले असता. उद्या सकाळी सगळ्यांना खास नाश्ता ( पैसे ) मिळणार आहे असे ते म्हणाले.. त्यामुळे महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज भाजप नेत्यांना काँग्रेसमध्ये आणून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असले... तरी, सभेत नागपूरकरांची गर्दी खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना खास कूपनचे वाटप करून गर्दी जमवावी लागत आहे... आता याचा गर्दीचा किती लाभ काँग्रेस पक्षाला कसा होतो हे येणाऱ्या निवडणुकीत पाहता येईल.


 


महत्त्वाच्या बातम्या:  




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha