एक्स्प्लोर
डॉल्बी लावण्यावरुन विश्वास नांगरे पाटील आणि उदयनराजे आमने-सामने
कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच, असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. पण कुणी काहीही म्हटलं तरी डॉल्बी लावून देणार नाही, प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असं नांगरे पाटलांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर : कुणीही काहीही म्हटलं तरी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजणार नाही. कुणी डॉल्बी वाजवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात डॉल्बी लावणारच... कोण अडवडतो ते बघतो, असं विधान केलं होतं. याला नांगरे पाटलांनी नाव न घेता उत्तर दिलं.
कुणालाही न जुमानता डॉल्बी लावणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डॉल्बीला बंदी आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी डॉल्बी यंत्रणा स्वतःच्याच ताब्यात सील बंद आदेश यापूर्वीच पारित केले आहेत. त्यामुळे डॉल्बी लावण्यासाठी बाहेर काढाल्यास पोलीस तात्काळ कारवाई करून जप्त करत आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बीचं समर्थन करत गणेश मंडळांनी डॉल्बी लावावा कोण अडवतोय पाहतो, असं विधान करत पोलिसांना आव्हान दिलं होतं. तर इकडे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता प्रति आव्हान देत डॉल्बी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असं म्हटलं आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्ये जून 2016 पासून आज अखेर 100 संघटीत गुन्हेगारी टोळीतील 667 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संघटीत गुन्हेगारीत हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव काळात 18 हजार 274 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पडावं यासाठी परिक्षेत्रात पाच पोलीस अधीक्षकांसह हजारो पोलीस रस्त्यावर बंदोबस्त करणार आहेत. परिक्षेत्रातील 13 हजार 284 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन होणार असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील 20 हून अधिक शहरही संवेदनशील असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement