एक्स्प्लोर
अमरावतीत दारु विक्रेत्याची महिलांकडून गावातून धिंड

अमरावती : गावातील अवैध दारु विक्रीविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी दारु विक्रेत्यांची गावातून अर्धनग्न अवस्थेत डोक्यावर चपला ठेऊन मिरवणूक काढली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे ही घटना घडली. गावातील देशी दारुचं दुकान बंद करण्यासाठी महिलांनी सर्वानुमते दारू बंदीचा ठराव करुन दारुचं दुकान बंद केलं. आता गावात कोणत्याच प्रकारची दारु गावात नको, अशी मागणी महिलांनी केली होती. ग्रामपंचायतीत याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीने ठराव करुनही गावात अवैध पद्धतीने गावठी दारु विक्री सुरुच होती.त्यामुळे दारु विक्रेत्याची संतप्त महिलांनी गावातून अर्धनग्न अवस्थेत डोक्यावर चपला ठेवून मिरवणूक काढली. शिवाय गावात पुन्हा दारु विक्री करण्याची हिंमत करु नये, अशी सक्ती ताकीदही दिली.
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















