एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पतीवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची नदीत उडी मारुन आत्महत्या
चारित्र्यावर संशय घेतल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. पत्नीने पती बबन सोयामवर कुऱ्हाडीने हल्ला केला.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला करुन स्वत:चं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पती किरकोळ जखमी झाला आहे. घुग्घुस शहराच्या नकोडा भागात हा प्रकार घडला. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने हा हल्ला केला.
आज पहाटे नकोडा इथल्या राहत्या घरी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यातून पत्नीने पती बबन सोयामवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात पती किरकोळ जखमी झाला. घटनेनंतर अर्चना सोयामने वर्धा नदीकडे धाव घेत नदीत उडी घेत आत्महत्या केली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. पती बबन सोयामला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान पोलिसांनी वर्धा नदी किनारा गाठून पत्नीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. परंतु या घटनेत चारित्र्यावर संशय घेतल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. घुग्घुस पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement