एक्स्प्लोर
स्टेजवर न बोलावल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर महिलेचा गोंधळ
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामंजस्य करार प्रमाणपत्र (MOU)देण्यात येत होते. मात्र एमओयू घेण्यासाठी आपल्याला स्टेजवर न बोलावता इतर लोकांना बोलावल्याने महिलेला संताप अनावर झाला आणि भर कार्यक्रमात तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात व्यासपीठावर बोलावून प्रमाणपत्र न दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एका महिलेनं गोंधळ घातला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सामंजस्य करार प्रमाणपत्र (MOU)देण्यात येत होते. मात्र एमओयू घेण्यासाठी आपल्याला स्टेजवर न बोलावता इतर लोकांना बोलावल्याने महिलेला संताप अनावर झाला आणि भर कार्यक्रमात तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान संबंधित महिलेचा अॅग्रो कंपनीशी संबंध नाही त्यामुळे तिला व्यासपीठावर बोलावले नसल्याचं स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र महिलेने गळ्यातल्या ओळखपत्राच्या दोरीने फास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महिलेची समजूत काढून तिला स्टेजवर बोलावून प्रमाणपत्र देण्यात आले. सुनीता खरात असे या महिलेचे नाव असून त्या बुलडाण्यातल्या राजमाता जिजाऊ महिला बचत गटासाठी काम करतात.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















