एक्स्प्लोर
पाच सावकारांच्या जाचामुळे महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : तब्बल 5 सावकारांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने पतीच्या औषधांसाठी 10 टक्के व्याजानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. चक्रवाढ व्याजामुळे ही रक्कम तब्बल 5 ते 6 लाखांपर्यंत पोहोचली. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी सावकारांना व्याजही दिलं होतं.
एका सावकाराच्या कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पीडितेनं दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतलं, अशामुळे पीडित महिलेवर अनेकांच्या कर्जाचा डोंगर झाला. मात्र आता व्याजाचे हफ्ते थकल्याने सावकारांचे सतत फोन येऊ लागले. सावकारांच्या उद्धट भाषेमुळे महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement