एक्स्प्लोर

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करुन दारु तस्कराला पळवलं!

उस्मानाबाद : दारु तस्करांची गुंडगिरी उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या दारु तस्कराला सोडवण्यासाठी काही गुंडांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण करत खुनी हल्ला केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालयात हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आरोपींनी अधिकाऱ्यांना मारहाण करून त्यांनी दारु तस्कराला पळवून नेले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा रिपाई पक्षाच्या युवक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून पोलिसात त्याच्यासह अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 एप्रिल रोजी सायंकाळी कळंब येथील कुसळंब माजलगाव रोड वर गोवा बनावटीची दार घेऊन जाताना एक टेम्पो पाठलाग करून पकडला. पोलिसांना या टेम्पोत तब्बल 9 लाख रुपयांची अवैध तस्करी होत असलेली दारु सापडली. यात मॅकडॉनल कंपनीचे वेगवेगळे ब्रँड असलेली 109 बॉक्स दारु होती. यानंतर अधिकाऱ्यांनी दारु असलेला ट्रक व आरोपी तस्कर मोतीराम भोसलेला उस्मानाबाद येथील कार्यालयात आणले व त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची दारु जप्त करून कायदेशीर कारवाई सुरु केली. त्यावेळी रोहन उर्फ मुन्ना खुणे हा 7 ते 8 जणांना घेऊन कार्यालयात आला व पकडलेली दारु व तस्कर भोसले याला सोडण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर खुणे याने लोखंडी रॉडने कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व कागदपत्रे फाडून टाकली. खुणे याने मारहाण केल्यानंतर दारु तस्कर भोसले याला कार्यालयातून पळवून नेले. दारु तस्कर भोसले आहे, जो कार्यालयातून पळून गेला असून याला सोडवण्यासाठी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे व उप निरीक्षक राजकुमार राठोड या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले आहेत. आरोपी खुणे याने राज्य उत्पादन शुलक विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन वर धमकी देत शिवीगाळ केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय?
लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय?
Maharashtra Weather: धो-धो पावसानं झोडपलं! विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; उभी पीकं आडवी, बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात, वाचा कुठे काय परिस्थिती
धो-धो पावसानं झोडपलं! विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; उभी पीकं आडवी, बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात, वाचा कुठे काय परिस्थिती
Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'

व्हिडीओ

Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: 'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
Vidhan Parishad Election 2026: 'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Embed widget