एक्स्प्लोर

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल

अधिकाधिक नागरिकांनी आपले हक्काचे घर मिळवण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (Mhada Lottery) सर्वे क्रमांक १२६+१२७/१, मौजे ताथवडे, पुणे (Pune) येथील टप्पा–२ अंतर्गत एकूण ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मंडळाच्या गृहनिर्माण भवनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मंडळाचे सभापती आढळराव पाटील यांनी ताथवडे गृहनिर्माण योजनेची माहिती दिली.

सदर योजनेतील मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांकरिता उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले व अधिकाधिक नागरिकांनी आपले हक्काचे घर मिळवण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ताथवडे परिसरातील ही योजना पुणे महानगर परिसरात गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या म्हाडाच्या प्रयत्नांना बळकटी देणारी असून, पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे करण्यात आले आहे. म्हाडाच्या सोडतीच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करून अर्ज करण्याची प्रक्रिया अविरत सुरु असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये 768 घरांसाठी जाहिरात

यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये ताथवडे टप्पा–२ अंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गट (LIG) व ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गट (MIG) अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेसाठी अल्प उत्पन्न गटातील २४ सदनिकांसाठी ४३८ अर्ज, तर मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिकांसाठी ३०४ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १३५ यशस्वी अर्जदारांनी स्वीकृती कळविली. अशाप्रकारे ७९२ सदनिकांपैकी पैकी १५० सदनिकांच्या वितरणाची कार्यवाही मंडळातर्फे करण्यात येत आहे.  उर्वरित अल्प उत्पन्न गटातील १ व मध्यम उत्पन्न गटातील ६३३ सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्वे क्रमांक १२६+१२७/१ ताथवडे पुणे येथील टप्पा–२ मधील अल्प उत्पन्न गटातील सदनिकेची किंमत रु. ४६ ते ४७ लक्ष दरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ७५.९६ चौ. मी. ते ७७.९९ चौ मी एवढे आहे . तसेच मध्यम उत्पन्न गटातील प्रती सदनिका किंमत रु. ६४.५० ते ६५.५० लक्ष दरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ८९.१५ चौ. मी. ते ९१.१८ चौ मी एवढे आहे.

चारचाकी वाहनासाठी पार्किंगची सुविधा 

या योजनेमध्ये  चार चाकी वाहनाकरीता प्रती सदनिका एक वाहनतळ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रहिवाशांकरिता स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स क्षेत्र, मुलांसाठी सुसज्ज खेळण्याची जागा, ओपन जिम, सौरऊर्जेवर आधारित ऑन-ग्रिड सोलर प्रणाली, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसह आधुनिक व पर्यावरणपूरक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर प्रसंगी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री राहुल साकोरे , मंडळाचे उपमुख्य अधिकारी श्री राहुल शिळीमकर , मिळकत  व्यवस्थापक श्री रामचंद्र भोसले व श्री रुपेश जायभाये व मंडळातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Embed widget