एक्स्प्लोर
Advertisement
कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी
"नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल", असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.
नाशिक : कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, अशी तंबी नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. तसेच, नागरिकांना केंद्रबिंदू मानून नाशिकमध्ये काम करणार असल्याचं आश्वासनही मुंढेंनी दिले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन बदली होत, तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली. अत्यंत कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख असणाऱ्या तुकारम मुंढेंनी आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
"नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल", असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.
"कोणताही नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल.", असा इशारा मुंढेंनी दिला.
अधिकाऱ्यांनी काम करताना संवेदनशीलता दाखवावी. नाशिककरांचे समाधान होईल असे काम मी करेन, असे सांगत तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, "शहराचे स्वास्थ्य, पर्यावरण टिकवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. पार्किंगसाठी नवे धोरण आणणार आहोत."
शहराचा विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी नमूद केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement