एक्स्प्लोर

नितेश राणे भाजपाध्यक्षांच्या बंगल्यावर, काँग्रेस कारवाई करणार?

नारायण राणेंच्या पुनर्वसनाबद्दल काल राजधानी दिल्लीत जी बैठक पार पडली, त्यात नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांची उपस्थिती आश्चर्यजनक होती.

नवी दिल्ली : नारायण राणेंच्या पुनर्वसनाबद्दल काल राजधानी दिल्लीत जी बैठक पार पडली, त्यात नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांची उपस्थिती आश्चर्यजनक होती. 11 अकबर रोड या भाजपाध्यक्ष अमित शहांच्या निवासस्थानी काल मध्यरात्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार नितेश राणे, भाजपचे आशिष शेलारही उपस्थित होते. नारायण राणेंनी काँग्रेस सोडताना आपल्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. पण नितेश राणे हे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपाध्यक्षांच्या निवासस्थानी होणाऱ्या अशा गुप्त बैठकीला हजेरी लावणं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेस पक्ष हे खपवून घेणार का?, पक्षाच्या शिस्तीबाहेरचं हे वागणं नाही का? असे सवाल उपस्थित होत आहेत. याबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी एबीपी माझानं फोनवर चर्चा केली असता, 'नितेश हे आपलं पुत्र कर्तव्य निभावत असावेत. पण त्यांची अवस्था ही त्यांच्या पित्याप्रमाणेच झाली आहे. आपण नेमके कुठे आहोत, भाजपसोबत आहोत की नाहीत या संभ्रमावस्थेत ते असावेत.' अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या वर्तणुकीबद्दल पक्ष काही पाऊल उचलणार का? असं विचारलं असता त्यांनी ही बाब पक्ष गंभीरतेनं घेत नसल्याचं सांगितलं. अर्थात नितेश राणेंचं हे वागणं खपवून घेण्यामागे काँग्रेसला आपलं विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची भीती वाटत असावी. कारण काँग्रेसचा एक आमदार कमी झाल्यास विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं. संंबंधित बातम्या : नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील? दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Embed widget