एक्स्प्लोर
Advertisement
अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने पतीकडून पत्नीची हत्या
अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने नरहरी श्रीमलने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना वळसंगमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, पत्नीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह घरातच पुरुन, ती बेपत्ता असल्याचा बनाव करत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पण पोलीस मित्राच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूर : सोलापूरमध्ये अनैतिक संबंधांच्या अडसर ठरल्याने, पतीनं पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचं उघड झालं आहे. पण एका पोलीस मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, अरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर त्याची प्रेयसी फरार झाली आहे.
आरोपी पती नरहरी याचे विनेदासोबत प्रेमसंबंध होते, मात्र याला नरहरीची पत्नी प्रवलिका उर्फ सोनी नरहरी श्रीमलचा अडसर होता. त्यामुळे नरहरीने 12 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा आवळून हत्या केली, आणि तिचा मृतदेह घरातच पुरुन ठेवला.
यानंतर नरहरीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करत, शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र पोलीस तपासात वेगळंच सत्य बाहेर आलं.
वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी सह पोलीस निरीक्षक सोनकांबळे यांना वळसंगमधील एका पोलीस मित्राने फोन करुन महिलेचा मृतदेह घरातच पुरल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घराचं खोदकाम करुन महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
या प्रकरणी पोलिसांनी नरहर श्रीमलला ताब्यात घेतलं आहे. तर त्याची प्रेयसी विनेदा संदुपटल फरार झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement