एक्स्प्लोर

शरद पवारांनी मोदींची ऑफर का नाकारली?

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानासंबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती, या भेटीवेळी एकत्रित काम करण्याची ऑफर पंतप्रधानांनी त्यांना दिली. परंतु पवारांनी ती ऑफर नाकारली होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती अशी धक्कादायक बातमी शरद पवार यांनी एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिली होती. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानासंबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती, या भेटीवेळी एकत्रित काम करण्याची ऑफर पंतप्रधानांनी त्यांना दिली, असं पवारांनी म्हटलं. मात्र शरद पवारांनी ऑफर नाकारल्याची माहिती पवारांनी एबीपी माझाला दिली. अतिवृष्टीच्यासंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी पवारांना थांबण्यास सांगितलं आणि हा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला, आपण एकत्रित काम केल्यावर आनंद होईल असं मोदी म्हणाले, मात्र पवारांनी ही ऑफर नाकारत असं म्हटलं की "आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत ते राहतीलही पण आपण एकत्र काम करणं मला राजकीय दृष्ट्या शक्य नाही'. पवार म्हणाले की, विकासाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात, शेतीबद्दल आपली मतं, भूमिका काही वेगळी नाही, मग मतभिन्नता कुठे आहे? असा सवाल मोदींनी त्यांचा मुद्दा पटवत केला, तुम्ही विरोधकांनीही आमच्यासोबत एकत्र येऊन देशासाठी काम करावं असंही ते म्हणाले. यावर पवारांनी असं उत्तर दिलं की "विरोधकांची विरोध करण्याची भूमिका माझ्याकडून कधी घेतली जाणार नाही, त्यामुळे त्याची चिंता नको". "एकत्रित येण्याचा तुमचा आग्रह मी नाही स्वीकारु शकत, मी एक लहानसा पक्ष चालवतो, आमच्या पक्षातील नेत्यांना मी जी दिशा दिली आहे ती काही आता बदलणं शक्य नाही", असंदेखील शरद पवार म्हणाले. परंतु शरद पवारांची ही उत्तरं राज्यातील तसेच देशातली राजकीय विश्लेषकांना तसेच लोकांनादेखील पटलेली नाहीत, असं चित्र आहे. त्याला तशी कारणंदेखील आहेत. 2014 साली शरद पवारांच्या मदतीमुळे भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली होती. यावेळी तीच संधी पुन्हा मिळत होती. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात आणि केंद्रातही सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळत होती. मग शरद पवारांनी मोदींची ऑफर का नाकारली? असा सवाल उपस्थित होतो. शरद पवारांनी मोदींची ऑफर नाकारण्यामागे अनेक कारणं आहेत. ऑफर नाकारताना पावारांनी राजकारणातील दूरगामी परिणामांचा विचार केला. सध्याची राजकीय स्थिती पाहून शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता. पवारांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्तास्थापन केली असती तर त्या सरकारवर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या प्रभाव राहिला असता. परंतु शिवसेनेसोबत सत्तास्थापन केली तर सत्तेचा रिमोट पवारांच्याच हातात राहणार आहे. 1995 साली शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता होती, परंतु सत्तेचा रिमोट मातोश्रीवर होता, अगदी तशाच प्रकारे आत्ता राज्यातील सत्तेचा रिमोट शरद पवारांच्या हातात असल्याचे बोलले जात आहे. मोदींची ऑफर नाकारण्याचे अजून एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे मोदींनी जेव्हा ऑफर दिली तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठीची कार्यवाही बरीच पुढे गेली होती. याचदरम्यान काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी स्वतः शरद पवारांनी काँग्रेस हायकमांडला राजी केलं होतं. त्यामुळे अशा परिस्थितीत शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला असता, तर शरद पवारांची प्रतिमा मलिन झाली असती. पवारांनी मोदींची ऑफर नाकारण्यामागचे तिसरे कारण म्हणजे, राष्ट्रवादीने ही विधानसभा निवडणूक भाजपविरोधात लढली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले होते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने चांगली झुंज दिली. परिणामी राज्यातील जनतेने राष्ट्रवादीच्या 54 उमेदवारांनी विजयी केलं. पवार हे जाणून आहेत की, राज्यातील जनतेने भाजपविरोधात मतदान केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली असती तर राज्यातले राष्ट्रवादीचे मतदार रागावले असते. दरम्यान, या सगळ्या गदारोळात एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीची मदत घेण्यास तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं अवघड आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार कशा प्रकारे चालवतात, यावर शरद पवारांचे पुढील निर्णय अवलंबून आहेत. पाहा काय म्हणाले शरद पवार? VIDEO पाहा : वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget