एक्स्प्लोर

पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या आत्महत्या का वाढल्या आहेत?

पुणे: पुण्यात सध्या आयटी इंजिनिअरच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. आज एकाच दिवशी दोन  इंजिनिअर्सनी आत्महत्या केल्या. निनाद पाटील या इंजिनिअरने पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमधील वर्धमान सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून, आयुष्य संपवलं. निनाद इन्फोसिस कंपनीत काम करत होता. त्याशिवाय पुण्याच्या कोंढव्यात बंगळुरूहून भेटायला आलेल्या महिला अभियंतेने प्रियकराने भेट न दिल्याने, इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यापूर्वी इंजिनिअर्सच्या आत्महत्या 2 एप्रिल 2017 - जीशन शेख, पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या या अभियंत्याने 11व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. 17 मार्च 2017 - दिघी येथील राजू तिवारी या अभियंत्याने पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. 3 फेब्रुवारी 2017 - अभिषेक यादव, हिंजवडीतील या अभियंत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अभियंत्यांच्या एकापाठोपाठ होणाऱ्या या आत्महत्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजवत आहेत. आत्महत्यांमागे कंपनीतील ताण-तणाव, नैराश्य, धकाधकीची जीवनशैली आणि व्यसनाधीनता याला कारणीभूत ठरत आहे. 2000 साली भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने धूम माजवायला सुरुवात केली. या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अगदी काही वर्षाचा अनुभव कर्मचाऱ्यांना सहा आकड्यांच्या घरात पगारा मिळवून देऊ लागला. यामुळं बांधकाम व्यवसायदेखील तेजीत चालू लागला. परिणामी अर्थ व्यवस्थेला मोठी गती मिळाली. एकीकडं अर्थव्यवस्थेला ही गती मिळत असताना यात अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. याची सुरुवात 2009 च्या आर्थिक मंदीपासून सुरु झाली, ती आजही या ना त्या कारणाने प्रकर्षाने दिसून येते. केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर प्रत्येक वर्षी इंजिनिअरिंगचे दीड लाख विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. सध्याची परिस्थिती पाहता 50 हजार हून अधिक जागा या रिक्त आहेत. तर जे शिक्षण घेऊन नोकऱ्या करत आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. त्याला भारतातील कंपन्यांची धोरणं जशी कारणीभूत आहेत तशीच परदेशात घडणाऱ्या घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत. भारतातील ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. कंपन्यांच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव आणि नैराश्य यातून या घटना घडत आहेत. ही परिस्थिती निवळायची असेल तर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! दोन गटातील किरकोळ वादानं संतापाचं टोक गाठलं; तुंबळ हाणामारीत शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू
बुलढाणा हादरलं! दोन गटातील किरकोळ वादानं संतापाचं टोक गाठलं; तुंबळ हाणामारीत शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू
Mumbai Crime News: अटक टाळण्यासाठी मागितली लाच, 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारताना PSI एसीबीच्या जाळ्यात, मुंबई पोलीस दलात खळबळ
अटक टाळण्यासाठी मागितली लाच, 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारताना PSI एसीबीच्या जाळ्यात, मुंबई पोलीस दलात खळबळ
Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget