एक्स्प्लोर

राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस का केली?

राज्याची वाटचाली राष्ट्रपती राजवटी सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. मात्र राज्यपालांनी हे पाऊल नेमकं का उचललं याची नेमकी कारणे काय आहेत?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 20 दिवस उलटून गेले तरी राज्यातील सत्तेचा तिढा सुटलेला नाही. राज्याची वाटचाली राष्ट्रपती राजवटी सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. मात्र राज्यपालांनी हे पाऊल नेमकं का उचललं याची नेमकी कारणे काय आहेत?

1. निवडणूक पूर्व युती किंवा आघाडीकडून विधिमंडळ निवडणूक पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर (25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर) 15 दिवस वाट पाहूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. परिणामी, निवडणूकपूर्व युती किंवा आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्यात असमर्थ ठरले आहेत. 2. त्यानंतर, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पाचारण करण्यात आले. मात्र, भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता व्यक्त केली. 3. त्यानंतर, सर्वात मोठा पक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या मुदतीत दावा केला असला तरी तो पर्याप्त संख्याबळाच्या आधारे करण्यात आलेला नाही. शिवसेनेने अधिक संख्याबळ मिळवण्यासाठी मागितलेली मुदत घोडेबाजारासाठी प्रोत्साहन देणारी ठरु शकत असल्याने नाकारण्यात आलेली आहे. 4. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या मुदतीत दावा न करता तसा दावा करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. मागितलेली ही मुदत घोडेबाजारासाठी प्रोत्साहन देणारी ठरु शकत असल्याने नाकारण्यात आलेली आहे. 5. दरम्यान, सर्वात मोठा पक्ष म्हणून चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने अद्याप विधिमंडळ नेताच निवडलेला नसल्याने त्यांना सत्तास्थापनेचा दावा करण्यास अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे आज राज्यपालांनी कायदेशीर प्रकिया पूर्ण करत केंद्र सरकारला कळवले की, अशास्थितीत राज्यात घटनात्मक तरतुदींनुसार शासन कार्यवाही शक्य नसल्याने कलम 356 अन्वये कार्यवाही करावी. राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार कसा चालतो?
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे
  • बऱ्याचदा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याचं सरकार चालवतात
  • राज्यपाल मुख्य सचिवांच्या साहाय्याने कारभार बघतात
  • या काळात राज्यपालांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत
  • मुख्यमंत्र्यांना असणारे अधिकारी राज्यपालांना वापरता येत नाहीत
  • राज्याचा अर्थसंकल्प संसद मंजूर करु शकते
  • राज्याच्या विधीमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे
  • कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना
  • राष्ट्रपती राजवटीत उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget